डिजिटल अर्थव्यवस्था

Rs. 158.00
Rs. 175.00
Rs. 158.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596930
Year: 2025
Pages: 126

सध्या आपण तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात जगत आहोत. पारंपरिक अर्थव्यवस्थेच्या जागी आता ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजेच डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. इंटरनेट, मोबाइल, कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), ब्लॉकचेन, आणि क्लाऊड संगणक यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद, पारदर्शक आणि सोपे झाले आहेत. 2015 मध्ये सुरू झालेल्या ‘डिजिटल इंडिया’ या अभियानामुळे भारतात डिजिटल बदलाची मजबूत सुरूवात झाली. णझख, इकखच ॲप, आधार कार्ड लिंक करणे, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन शिक्षण आणि बँकिंग या गोष्टींमुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार खूप सोपे झाले आहेत. या पुस्तकामध्ये ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजावले आहे. पुस्तकात चार भाग आहेत- डिजिटल बँकिंग, डिजिटल पैसे (चलन), तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सरकारी योजना. पुस्तकात सोपी भाषा वापरली आहे, हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांनाही उपयुक्त आहे. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर आपल्याला डिजिटल युगात आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्ग दाखवते. सायबर सुरक्षेची, डिजिटल साक्षरतेची आणि नागरिकांच्या सहभागाची जाणीव करून देते. भारत विकसित होण्यासाठी ही डिजिटल क्रांती खूप महत्त्वाची ठरणार आहे.

1. डिजिटल अर्थव्यवस्थेचा परिचय
1.1 डिजिटल अर्थव्यवस्था अर्थ
1.2 डिजिटल अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
1.3 डिजिटल अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
1.4 डिजिटलायझेशन विरुद्ध पारंपारिक अर्थव्यवस्था
1.5 डिजिटल परिवर्तन
1.6 ई-मार्केट, अर्थ, ई-मार्केटचे महत्त्व, पारंपारिक बाजार विरुद्ध ई-मार्केट
1.7 डिजिटल अर्थव्यवस्थेचे घटक-
i) ई-व्यवसाय, ii) ई-व्यवसाय पायाभूत सुविधा, iii) ई-कॉमर्स
1.8 व्यवसाय आणि समाजावर डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रभाव- व्यवसाय मॉडेलमधील बदल, सामाजिक परिणाम.

2. डिजिटल बँकिंग, डिजिटल चलन आणि सोशल मीडिया
2.1 डिजिटल बँकिंगची अर्थ-वैशिष्ट्ये
2.2 भारतातील डिजिटल बँकिंगची वाढ
2.3 डिजिटल बँकिंगचे प्रकार मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, ई व्हॅलेट, एनईएफटी, आरटीजीएस
2.4 डिजिटल पेमेंट सेवा
2.5 डिजिटल चलनाचा अर्थ-प्रकार
2.6 क्रिप्टोकरन्सी
2.7 बिटकॉइन अर्थ, वैशिष्ट्ये
2.8 डिजिटल चलनाचे फायदे आणि तोटे
2.9 सोशल मीडिया
2.10 व्यवसायासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
2.11 सोशल मीडियाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
2.12 डिजिटल अर्थव्यवस्थेत ग्राहकांचे वर्तन
2.13 डिजिटल परिवर्तनाचा ग्राहक वर्तनावर परिणाम
2.14 डिजिटल अर्थव्यवस्थेचे भविष्य.
2.15 युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (ULI) कर्जवाटप क्षेत्रातील नवी क्रांती

3. डिजिटल इकॉनॉमीमधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा कल
3.1 ब्लॉकचेन तंत्रज्ञान
3.2 इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT)
3.3 मशीन लर्निंग
3.4 बिग डेटा विश्लेषण
3.5 क्लाउड कॉम्प्युटिंग
3.6 ऑटोमेशन आणि रोबोटिक्स
3.7 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
3.8 गिग इकॉनॉमी आणि फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्स - आधुनिक रोजगाराची नवी संधी.
3.9 डिजिटल जाहिरात आणि प्रभावशाली अर्थव्यवस्था
3.10 क्वांटम संगणनप्रणाली
3.11 मेटाव्हर्स आणि विस्तारित वास्तव (XR) प्रणाली

4. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारी उपक्रम
4.1 थेट लाभ हस्तांतरण
4.2 सरकारी ई-मार्केटप्लेस
4.3 ई-नाम: कृषी मालासाठी पॅन-इंडिया इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल.
4.4 मृदा आरोग्य कार्ड: शेतीसाठी आवश्यक पोषक आणि खतांची पीकनिहाय शिफारस प्रणाली
4.5 भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM)
4.6 डोमेन विशिष्ट उत्कृष्टता केंद्रे (CoEs)
4.7 नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी जनरल-नेक्स्ट सपोर्ट पोर्टल (जेनेसिस)
4.8 तंत्रज्ञान उन्नती आणि उद्योजकता विकास (TIDE 2.0)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व विद्यापीठांच्या प्रथम वर्ष पदवी (VEC) तसेच द्वितीय वर्ष पदवी (VSC) अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!