आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे, आणि त्यासोबतच सायबर सुरक्षेचे आव्हानही अधिक गंभीर बनले आहे. वैयक्तिक माहितीपासून ते राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत, सायबर हल्ल्यांचा धोका सर्वच स्तरांवर वाढत आहे. सायबर गुन्हेगारी, घुसखोरी, माहिती चोरी आणि डिजिटल यंत्रणांचा गैरवापर यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि संस्था सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.
‘सायबर सुरक्षेची मूलतत्त्वे’ हे पुस्तक सायबर सुरक्षेच्या वैयक्तिक, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील पैलूंवर सखोल प्रकाश टाकते. माहिती तंत्रज्ञानातील संज्ञा, प्रणाली, नेटवर्क सुरक्षा, घुसखोरी प्रतिबंध, आपत्ती पुनर्प्राप्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचे सुलभ आणि समर्पक विवेचन यात करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि सामान्य वाचकांसाठी हे पुस्तक सायबर सुरक्षेच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. डिजिटल युगात सुरक्षिततेचा मूलमंत्र म्हणजे जागरूकता, सावधगिरी आणि योग्य तांत्रिक ज्ञान. हे पुस्तक त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
1. सायबर सुरक्षेचा परिचय
1.1 सायबर सुरक्षेची व्याख्या, व्याप्ती आणि महत्त्व
1.2 सायबर स्पेसचे घटक : इंटरनेट, नेटवर्क, डेटा, संगणक आज्ञावली/सॉफ्टवेअर
1.3 सायबर गुन्हे : प्रकार, वगकरण आणि प्रत्यक्ष उदाहरणे
2. सायबर धोके आणि हल्ले
2.1 मालवेअर : व्हायरस, वर्म्स, ट्रोजन, रॅन्समवेअर, स्पायवेअर
2.2 फिशिंग, फार्मिंग, स्पूफिंग, सोशल इंजिनिअरिंग हल्ले
2.3 सेवा नाकारणे (DoS) आणि वितरित डॉस हल्ले
2.4 प्रगत पर्सिस्टंट / दीर्घकालीन धोके
3. नेटवर्क आणि संप्रेषण सुरक्षा
3.1 नेटवर्कची मूलभूत तत्त्वे - लँन, वँन, आय. पी. टी. सी. पी.
3.2 फायरवॉल, घुसखोरी शोध प्रणाली आणि घुसखोरी प्रतिबंध प्रणाली
3.3 नेटवर्क सुरक्षा प्रोटोकॉल
3.4 वायरलेस नेटवर्क भेद्यता आणि सुरक्षेच्या उपाययोजना
4. ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्लिकेशन सुरक्षा
4.1 विंडोज, लिनक्स आणि अँड्रॉइडमधील सुरक्षा भेद्यता
4.2 सुरक्षित सुरक्षित संगणक आज्ञावली विकासाचे जीवनचक्र
4.3 वेब ॲप्लिकेशन भेद्यता : एसक्यूएल इंजेक्शन, क्रॉस-साइट स्क्रिप्टिंग
4.4 ब्राउझर आणि ईमेल सुरक्षा
5. सायबर सुरक्षा व्यवस्थापन आणि धोरणे
5.1 संघटनात्मक सायबर सुरक्षा धोरणे आणि प्रशासन
5.2 सुरक्षा परीक्षण, जोखीम व्यवस्थापन आणि व्यवसाय सातत्य
5.3 घटना प्रतिसाद नियोजन आणि आपत्ती पुनर्प्राप्ती
5.4 मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका
6. सायबर सुरक्षेमध्ये उदयोन्मुख प्रवाह आणि करिअरची संधी
6.1 सायबर संरक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता
6.2 इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्लाउड सुरक्षा
6.3 सायबर सुरक्षेसाठी ब्लॉकचेन
6.4 सायबर सुरक्षा कॉम्प टीआयए सिक्युरिटी
6.5 सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील करिअरच्या संधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - संरक्षणशास्त्र (सत्र 3 व 4) (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक