छात्रसेवाकाल हा बी.एड. अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून शिक्षक प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. या कालावधीत प्रशिक्षणाथ शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करून शिक्षणाच्या विविध पैलूंशी परिचित होतात. शाळेतील कार्यपद्धती, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या गरजा, उपक्रम, मूल्यांकन प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाज यांचा अनुभव घेऊन ते अध्यापन व्यवसायातील वास्तवाशी जवळून जोडले जातात.
या ग्रंथात छात्रसेवाकालाची संकल्पना, उद्दिष्टे, नियोजन व अंमलबजावणी, शाळेची वैशिष्ट्ये, शाळा व समाजातील परस्पर आंतरक्रिया, मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका, अध्यापन व्यवसायाचे स्वरूप व त्यातील समस्या, शिक्षक-विद्याथ संबंध, पालक-शिक्षक संबंध तसेच शैक्षणिक संशोधनाची गरज व महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे साध्या, सरळ आणि मुद्देसूद भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.
हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी छात्रसेवाकाल हा घटक किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.
1. छात्र सेवाकाल परिचय
(Introduction of Iternship.)
छात्रसेवाकाल : अर्थ, संकल्पना आणि वैशिष्ट्ये
छात्रसेवाकाळेची गरज / आवश्यकता.
छात्रसेवाकालाची उद्दिष्टे व महत्त्व.
छात्रसेवाकालाचे नियोजन व त्याची अंमलबजावणी.
छात्रसेवाकालाचे फायदे व मर्यादा.
शाळेची वैशिष्ट्ये.
शाळा व समाज यांच्यातील परस्पर आंतरक्रिया.
2. शाळेचे कार्ये
(Function of School)
शाळा: अर्थ आणि स्वरूप, वैशिष्ट्ये
शाळेतील आवश्यक पायाभूत सुविधा.
मुख्याध्यापकाची भूमिका व जबाबदाऱ्या.
मुख्याध्यापक आणि इतर घटकांमधील सहसंबंध
शाळा आणि लोकसमुदाय यामधील परस्परसंबंध
अभ्यासपूर्वक राबवलेल्या उपक्रमांमुळे बालकांच्या विकासावर होणारे फायदे.
RTE 2009 नुसार मुख्याध्यापकांची जबाबदाऱ्या.
3. सुविधा पुरविणारा म्हणून शिक्षकाची भूमिका
(Teachers as a Facilitator)
शिक्षकांना सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तीची विविध भूमिका.
अध्यापन व्यवसायाचे स्वरूप.
शिक्षक सुविधा पुरवणारा आहे या विधानाची चर्चा.
आजच्या कालातील शिक्षकाची भूमिका
अध्यापन व्यवसायाची वैशिष्ट्ये व महत्त्व.
अध्यापन व्यवसायातील समस्या व त्यासाठी उपाययोजना
अध्यापन व्यवसाय नीतीची गरज.
शाळा हे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाचे मुख्य केंद्र असावे.
अभ्यासक्रमाच्या विकास प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका.
मूल्यमापनात शिक्षकाची भूमिका.
शिक्षक-विद्याथ अंतरसंबंध.
विद्याथ - विद्याथ परस्पर संबंध.
पालक शिक्षक संबंध.
शाळा आणि शिक्षकांचा संबंध
4. शैक्षणिक संशोधन
(Educational Research)
शैक्षणिक संशोधनाची संकल्पना, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, स्वरूप आणि व्याप्ती.
कृती संशोधन: स्वरूप, गरज आणि त्याचे महत्त्व.
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाची गरज आणि त्याचे महत्त्व.
कृती संशोधनाची व्याप्ती व त्याच्या प्रमुख पायऱ्या
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाची आवश्यकता आणि महत्त्व.
कृती संशोधन आराखड्याचे फायदे, व महत्त्व
कृती संशोधनातील आराखड्याचे प्रमुख घटक व टप्पे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ