शिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे शैक्षणिक पाठ्यपुस्तक भूगोल विषयाच्या अध्यापनशास्त्राचा सखोल अभ्यास घडवते. नियोजन, मूल्यमापन, अध्यापनाच्या पद्धती, प्रतिमाने, रचनावाद, फिप्ड क्लासरूम यांसारख्या आधुनिक अध्यापन संकल्पना विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात.
या पुस्तकात भूगोल शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये, व्यावसायिक विकासाची गरज, सेवांतर्गत प्रशिक्षण, तसेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर यांवर विशेष भर दिला आहे. हवामानशास्त्र, प्रादेशिक भूगोल, मानवी भूगोल, ऊर्जा साधने, जलसंपत्ती, पर्यावरणीय समस्या अशा विविध संकल्पनांचा सखोल ऊहापोह करून विद्यार्थ्यांना विषयाची व्यापक समज दिली जाते.
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाशी सुसंगत अशा या ग्रंथात क्षेत्रभेट, सर्वेक्षण, अहवाल लेखन, ई-स्त्रोतांचा वापर यांसारख्या अध्ययन-अध्यापनाच्या साधनांचा सविस्तर आढावा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते आणि अध्यापन अधिक परिणामकारक होते.
भूगोल विषयातील सामाजिक समस्या जसे की पर्यावरण ऱ्हास, लोकसंख्या विस्फोट, नागरीकरण, जंगलतोड यांचा विचार करून शैक्षणिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामुळे हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारे ठरते.
लेखकांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव आणि शास्त्रशुद्ध मांडणी यामुळे हे पुस्तक शिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्याथ, प्रशिक्षणाथ शिक्षक, संशोधक आणि अभ्यासक यांच्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.
1. नियोजन आणि मूल्यमापन
(Planning and Evaluation)
1.1 भूगोल अध्यापनाची संकल्पना गरज आणि महत्त्व
(Concept Need and Importence of teaching Geography)
1.2 अध्यापन नियोजन - वार्षिक नियोजन, घटक नियोजन, आणि पाठ नियोजन (Annual Plan, Unit Plan, Lesson Plan, Prepair various methods)
1.3 घटक चाचणीची रचना व संविधान तक्ता
(Construction of Unit Test, Blue Print)
1.4 प्रश्नपेढीचा विकास (Development of Question bonk)
1.5 परीक्षेचे प्रकार (Types of Examination)
1.6 सतत, नियमित आणि व्यापक मूल्यांकनाचा दृष्टीकोन
(Approach of continuous and comprehensive Evaluation)
2. भूगोलाचे अध्यापन
(Teaching of Geography)
2.1 भूगोल अध्यापनाची संकल्पना (Concept of Geography Teaching)
2.2 भूगोल अध्यापनाच्या पद्धती
(Methods of Teaching of Geography)
2.3 भूगोल अध्यापनाचे प्रतिमाने (Models of teaching of Geography)
2.4 रचनावाद (Constructivism approach)
2.5 फिप्ड क्लासरूम (Flipped Classroom) किंवा उलटी वर्गखोली
3. भूगोल शिक्षक
(Geography Teacher)
3.1 भूगोल शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये
(Qualities of a Geography Teacher)
3.2 भूगोल शिक्षकाच्या व्यवसाय विकासाची गरज व महत्त्व
(Need of Professional Development of Geography Teacher)
3.3 भूगोल शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण
(In-service Training)
3.4 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान चे गरज व महत्त्व
(Need and Importance of ICTE in Teaching of Geography)
3.5 भूगोलातिल शोध (Explores in Geography)
4. भूगोलातील संकल्पना
(Advance concepts in Geography)
4.1 हवामान शास्त्रातील आधुनिक संकल्पना
(Advance concepts in climatology)
4.2 प्रादेशिक भूगोलातील आधुनिक संकल्पना
(Advance concept in Regional Geography)
4.3 मानवी भूगोलातील आधुनिक संकल्पना
(Advance Concepts in Human Geography)
4.4 भारतीय उद्योग व्यापार आणि वाहतूक
(Industries, Trade and Transportation in India)
4.5 भारताचे पर्यटन आणि दुर्गम भागातील प्रदेशाचा प्रवास
(Tourism of India, Trakking)
4.6 पारंपारिक आणि अपारंपारिक ऊर्जा साधने
(Renewable and non-renewable Energy)
5. पृथ्वीचे स्वरूप
(Natural of Earth)
5.1 पृथ्वीची रचना
5.2 खंड निर्मितीची संकल्पना
5.3 खडकाचे प्रकार
6. जलसंपत्ती
(Water Resources)
6.1 नदीचे कार्य
6.2 भूजलाचे कार्य
6.3 हिमनदीचे कार्य
6.4 सागर जलसंपत्ती
6.5 सागरी प्रवाह आणि त्याचे परिणाम
6.6 बेट
7. भूगोलातील समस्या आणि उपक्रम
(Issues and Activities in Geography)
7.1 पर्यावरण ऱ्हासाचा कायदा
7.2 लोकसंख्या विस्फोट (Population Explosion)
7.3 दहशतवाद
7.4 नागरीकरण
7.5 जंगलतोड
7.6 भूगोलाच्या विविध संघटना
8. अध्ययन-अध्यापनाचे स्रोत
(Teaching Learning Resources)
8.1 क्षेत्रभेट (Field Visit)
8.2 सर्वेक्षण (Surveys)
8.3 अहवाल (Report)
8.4 ई-स्त्रोत (E-Resources)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्.च्या
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ