भारतीय संविधान - मानव मुक्तीचा जाहीरनामा

Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605786
Year: 2025
Pages: 68

भारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या जगातील सर्वोत्तम मानवी मूल्यांचे एक अजब रसायन आहे. समाज परिवर्तनाच, व्यवस्था परिवर्तनाच एक अमोघ साधन आहे. भारतीय संविधानामुळेच उभी असलेली बहुजनांचे शोषण करणारी, अन्याय, अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार करणारी चातुर्वर्ण व्यवस्था आज बहुतांशी प्रमाणात (पुर्णतः नाही) जमीनदोस्त झालेली आहे, आडवी झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. भारतीय संविधानामुळेच कालचा दुर्बल आजचा सबल झालेला आहे. बेजान आणि मृतप्राय पडलेल्या मानवी शरीरात आज नवचैतन्य आलेले आहे. पेशवाईच्या काळात गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू घालून फिरणारा समाज आज सुटाबुटात वावरायला लागला आहे. कालचा गावकुसाबाहेर वास्तव्य करणारा समाज आज गावाच्या आत आलेला आहे. गावच्या मध्यापर्यंत येऊन पोहचला आहे. डोंगरदऱ्यात, गिरीकंदरात राहणारा समाज आज गावात ताठ मानेने राहत आहे. स्वभाव हरवलेल्या समाजमनात पुन्हा आत्मभान, आत्मबल, आत्मसन्मान, आत्मतेज निर्माण झालेले आहे, ते दिवसेंदिवस विकसित होत चाललेले आपणास दिसत आहे.

1. भारतीय संविधानाची पार्श्वभुमी
* संविधानाची पार्श्वभुमी
* पाश्चिमात्य देशातील राज्यघटना निर्मिती
* संविधानाची किंवा राज्यघटनेची व्याख्या
* भारतीय संविधान निर्मिती पूर्व परिस्थिती
* भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
* 1946 ची कॅबिनेट मिशन तथा त्रिस्तरीय योजना

2. 1947 चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
* भारतीय संविधानाची निर्मिती
* भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया
* भारतीय संविधानाची निर्मिती
* भारतीय संविधाना विषयी थोडक्यात
* घटना समितीतील विविध सदस्य
* संविधान सभेत महिलांचा सहभाग
* भारतीय संविधान निर्मिती पूर्वस्थिती
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीत प्रवेश
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मसुदा समितीतील योगदान

3. भारतीय संविधान
* भारतीय संविधान
* भारतीय संविधानात नेमके काय आहे?
* भारतीय संविधानाची सुरुवात
* भारतीय संविधानातील लोकशाही विषयक विचार
* भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील महत्त्वपूर्ण बाबी

4. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये
* भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये
* लिखित व निर्मित राज्यघटना
* विस्तृत राज्यघटना
* एकेरी राज्यघटना
* भारतीय राज्यघटना अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ
* संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार
* प्रौढ मताधिकार
* न्याय विभागाचे स्वातंत्र्य
* भारतीय राज्यघटनेने न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पात्रता निश्चित केलेल्या आहेत.
* कल्याणकारी राज्य
* एकेरी नागरिकत्व
* समाजवादाचा स्वीकार

5. भारतीय संविधान : मूलभूत हक्क आणि कर्त्यव्ये
* संविधानाने दिलेले मूलभूत हक्क
* मूलभूत हक्कांचे महत्व
* भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य
* मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व

6. भारतीय संविधान : एक दृष्ठिक्षेप
* भारतीय संविधानातील महत्वपूर्ण बाबी
* भारतीय संविधानाचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा
* भारतीय संविधानाची सद्यस्थिती
* भारतीय संविधाना प्रती आमची जबाबदारी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमानुसास उपयुक्त पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!