भारतीय नाणकशास्त्राची ओळख

Rs. 176.00
Rs. 195.00
Rs. 176.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373444734
Year: 2026
Pages: 138

नाणी ही केवळ व्यवहाराची साधने नसून, ती संस्कृतीची प्रतिबिंबे आणि इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या सूक्ष्म रचनेत सत्तेचे वैभव, अर्थव्यवस्थेची घडण, श्रद्धा-विश्वासांची दिशा आणि कलेची अभिव्यक्ती दडलेली असते.
या पुस्तकात नाणकशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, भारतीय नाण्यांचा प्राचीन ते आधुनिक काळातील प्रवास, तसेच नाण्यांमधून उलगडणारे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक आयाम सुलभ भाषेत मांडले आहेत. अभ्यासक, विद्याथ आणि रसिक वाचक यांना नाण्यांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळावी, हीच या लेखनाची उद्दिष्टे.
भारतीय नाण्यांची परंपरा ही वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे-जनपदांच्या साध्या नाण्यांपासून ते मुघल, मराठा आणि ब्रिटिश काळातील भव्य चलनप्रणालीपर्यंत. प्रत्येक नाणे हे एका युगाचे प्रतिबिंब आहे आणि त्या काळाची कथा सांगणारे मौन साक्षीदार आहे.
हे पुस्तक अभ्यासक्रमाशी सुसंगत असले तरी परीक्षापुरते मर्यादित नाही. इतिहासाच्या गाभ्याशी असलेली समृद्धता जपत, नाण्यांमधील कहाण्या जाणून घेण्याची जिज्ञासा वाढवणे आणि अभ्यासाची गोडी निर्माण करणे-हा यामागचा खरा हेतू आहे.

1. नाणकशास्त्र
(Numismatics)
अ. व्याख्या, व्याप्ती आणि इतिहासाचे एक साधन म्हणून नाणकशास्त्र
ब. नाणकशास्त्रीय पुरावस्तू : नाणी, मुद्रा, पदके आणि ताईत
क. नाणकशास्त्रीय अभ्यासाचे पैलू - आकार, वजन, धातू, चिन्हे आणि लिपी

2. प्राचीन भारतीय नाणी
(Ancient Indian Coins)
अ. भारतातील नाण्यांचा उगम आणि प्राचीनता (दुसरे नागरीकरण आणि नाणी), आहत नाणी, जनपदांची नाणी
ब. इंडो-ग्रीक, कुषाण आणि सातवाहन
क. गुप्त काळ

3. मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय नाणी
(Medieval and Modern Indian Coins)
अ. सुलतानशाही, विजयनगर आणि मुघल
ब. बहमनी आणि मराठा काळ
क. ब्रिटिश आणि भारतीय संस्थाने

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 4) (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!