भारतीय अर्थव्यवस्था 1991 पासून (भाग 2)

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373447469
Year: 2026
Pages: 100

1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, कोट्यवधी नागरिकांच्या आकांक्षा, संघर्ष आणि संधींचा इतिहास आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या त्रिसूत्रीपासून ते डिजिटल इंडिया, णझख आणि स्टार्टअप क्रांतीपर्यंतचा प्रवास हा धोरणात्मक धाडस आणि सामाजिक परिवर्तनाचा आहे.
या पुस्तकात शेती, उद्योग, बँकिंग, डिजिटल क्रांती, स्टार्टअप संस्कृती आणि जागतिक स्तरावरील भारताची भूमिका यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आर्थिक धोरणांचा थेट परिणाम शेतकरी, कामगार, उद्योजक, विद्याथ आणि मध्यमवगय कुटुंबांच्या जीवनावर कसा होतो, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण येथे आहे.
भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना बेरोजगारी, विषमता आणि कौशल्य विकास यांसारखी आव्हानेही समोर आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा, क्षमता आणि भविष्यातील शक्यता समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरतो.
भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा केवळ आकडेवारीचा किंवा धोरणांचा अभ्यास नाही, तर तो सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. या पुस्तकात आर्थिक सुधारणा आणि डिजिटल क्रांतीने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक संरचनेवर केलेल्या परिणामांचा सखोल वेध घेतला आहे.
याचबरोबर, भारताच्या जागतिक भूमिकेतील बदल, विकसनशील देशांचा आवाज म्हणून उभे राहणे आणि आर्थिक राजनयातून निर्माण झालेल्या संधी यांचा चिकित्सक आढावा येथे आहे. त्यामुळे हे पुस्तक भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा संगम साधत, भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वांगीण चित्र वाचकांसमोर ठेवतो.

1. भारतातील कृषी, औद्योगिक आणि सहकारी क्षेत्र
1.1 भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचे स्थान
1.2 स्वामिनाथन आयोगाच्या मुख्य शिफारशी
1.3 कृषी वित्त
1.3.1 कृषी वित्ताचे महत्त्व
1.3.2 कृषी वित्ताचे स्रोत
1.4 कृषी विपणन
1.4.1 भारतीय कृषी विपणनातील प्रमुख दोष
1.4.2 कृषी विपणनातील प्रमुख सुधारणा
1.5 शेतकरी आत्महत्या
1.5.1 शेतकरी आत्महत्येची प्रमुख कारणे
1.5.2 शेतकरी आत्महत्या रोखण्याचे उपाय
1.6 आर्थिक विकासातील औद्योगिकीकरणाची भूमिका
1.7 हस्तनिर्मित, लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणावरील उद्योगांची संकल्पना
1.7.1 हस्तकला उद्योग : एक परिचय
1.7.2 लघु उद्योग
1.7.3 मध्यम उद्योग
1.7.4 मोठे उद्योग
1.8 औद्योगिक धोरण
1.9 भारतातील सहकारी चळवळ
1.9.1 सहकारी क्षेत्राचा अर्थ
1.9.2 भारतीय सहकार क्षेत्राची प्रमुख वैशिष्ट्ये
1.9.3 भारतीय सहकारी क्षेत्राची प्रमुख उद्दिष्टे
1.9.4 भारतीय सहकारी क्षेत्रातील प्रमुख दोष

2. आर्थिक नियोजन आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील अलीकडील बदल
2.1 आर्थिक नियोजनाची ओळख
2.1.1 आर्थिक नियोजनाचा अर्थ
2.1.2 आर्थिक नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे
2.2 आर्थिक नियोजनातील यश आणि अपयश.
2.2.1 आर्थिक नियोजनाची प्रमुख यशप्राप्ती
2.2.2 भारतातील आर्थिक नियोजनाचे अपयश
2.3 नीती आयोग
2.3.1 नीती आयोगाची स्थापना
2.3.2 नीती आयोगाची मुख्य उद्दिष्टे
2.3.3 नीती आयोगाची संघटनात्मक रचना
2.4 नियोजन आयोग आणि नीती आयोग यांमधील मुख्य फरक
2.5 थेट लाभ हस्तांतरण योजना
2.5.1 थेट लाभ हस्तांतरण योजनेचे प्रमुख फायदे
2.5.2 थेट लाभ हस्तांतरण योजनेचे तोटे किंवा आव्हाने
2.6 प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना
2.6.1 प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची प्रमुख उद्दिष्टे
2.7 मेक इन इंडिया
2.7.1 मेक इन इंडिया - परिचय
2.7.2 ‌‘मेक इन इंडिया‌’ योजनेची उद्दिष्टे
2.7.3 ‌‘मेक इन इंडिया‌’ योजनेचे फायदे
2.7.4 ‌‘मेक इन इंडिया‌’चे महत्त्व
2.7.5 ‌‘मेक इन इंडिया‌’पुढील आव्हाने
2.8 स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडियाची संकल्पना
2.8.1 स्टार्टअप इंडिया
2.8.2 ‌‘स्टँड अप इंडिया‌’ योजना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष कला - अर्थशास्त्र (सत्र 4) (MIN) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!