विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि अभ्यासक्रमातील बदल लक्षात घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाशी सुसंगत राहून द्वितीय वर्ष कला शाखेसाठी “बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा“ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकात भारतीय बँकिंग प्रणालीचा परिचय, बँकांची कार्ये व उद्दिष्टे, व्यापारी व सहकारी बँकांची भूमिका, लघु वित्त व पेमेंट बँकांची कार्ये, रिझर्व्ह बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी व धोरणात्मक कार्ये, तसेच भारतातील वित्तीय संस्थांची रचना व कार्ये यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सोप्या भाषेत, स्पष्ट मांडणीसह आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तयार केलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी, संकल्पनांची समज आणि व्यावहारिक ज्ञान मिळविण्यास उपयुक्त ठरेल.
हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक वित्तीय प्रणालीतील बदल समजून घेता येतील आणि भविष्यातील करिअर संधींसाठी भक्कम पाया तयार होईल. तसेच, बँकिंग क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय आणि वित्तीय संस्थांची भूमिका यांचा व्यापक दृष्टिकोन मिळविण्यास हे पुस्तक सहाय्यभूत ठरेल.