‘बाल्यावस्था आणि वाढ’ हे पुस्तक बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासाचे सखोल आकलन करून शिक्षकांना प्रभावी अध्यापनाची दिशा दाखवते. बालक-केंद्रित शिक्षण, अनुभवाधारित अध्ययन आणि सर्वांगीण विकास या संकल्पनांना अधोरेखित करत हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणासाठी मूलभूत मार्गदर्शक ठरते.
विकासाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण, मानसशास्त्रीय सिद्धांतांचे सुलभ विवेचन आणि व्यवहार्य उदाहरणे यामुळे वाचकांना विषय अधिक स्पष्टपणे समजतो. बालकांच्या वाढीतील सामाजिक-सांस्कृतिक घटक, पालकत्व शैली, किशोरावस्थेतील आव्हाने आणि शिक्षकाची भूमिका यांचा सखोल अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे.
प्रत्येक प्रकरणात चिंतनात्मक प्रश्न, कृतीसूचना आणि आधुनिक अध्यापन दृष्टिकोनांचा समावेश करून हे पुस्तक केवळ सैद्धांतिक माहितीपुरते मर्यादित राहत नाही, तर प्रत्यक्ष अध्यापनात त्याचा उपयोग कसा करावा याची दिशा देते. बदलत्या शैक्षणिक गरजा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि विद्याथ-केंद्रित शिक्षण यांचा विचार करून विषयाची मांडणी करण्यात आली आहे.
सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि तर्कशुद्ध क्रमाने मांडलेले हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये आत्मसात करण्यास हे पुस्तक निश्चितच मदत करेल, असा विश्वास आहे.