बालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र

Rs. 266.00
Rs. 295.00
Rs. 266.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373447575
Year: 2025
Pages: 204

बालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र हा ग्रंथ खढएझ अभ्यासक्रमानुसार तयार केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकात बालकाच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. बालकाच्या विकासाच्या विविध टप्प्यांपासून ते शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासापर्यंतच्या सर्व घटकांचे बारकाईने विश्लेषण या ग्रंथात केले आहे. याशिवाय अध्ययन प्रक्रियेशी संबंधित वर्तनवाद, ज्ञानवाद, समष्टिवाद व रचनावाद यांसारख्या विचारसरणींचे विवेचन, अध्ययनातील माहिती प्रक्रियाकरणाचे प्रतिमान, समस्यानिराकरणासाठीचे उपाय, शोध अध्ययन तसेच श्री अरविंदो यांचा एकात्मिक उपागम अशा अनेक पैलूंवर सविस्तर चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसंबंधी सिद्धांत, प्रेरणा देण्याच्या विविध कार्यनीती, वर्गव्यवस्थापनाची शास्त्रीय मांडणी, समूहगतिशीलता तसेच समाजमितीचा उपयोग यामुळे हे पुस्तक अधिकाधिक उपयुक्त ठरते.
सोप्या व सुबोध भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षणाथ आणि शिक्षणशास्त्रातील संशोधक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. खढएझ अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टपूतसाठी हे पुस्तक निश्चितच प्रभावी ठरेल असा विश्वास वाटतो.

1. बालकाचा विकास
1.1 बालकाचा विकास प्रक्रियेचा अर्थ व महत्त्व
1.2 बालकाच्या विकासात्मक प्रक्रियेच्या पुढील अवस्थांची वैशिष्ट्ये
1.3 मनस, चित्त, बुध्दी
1.4 शैक्षणिक उपयोजन/महत्त्व

2. विकासात्मक प्रक्रिया
2.1 विविध क्षेत्रात होणारा विकास
2.2 विकासावर परिणाम करणारे घटक
2.3 वैयक्तिक भेद/व्यक्तिभेद
2.4 विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनात शिक्षकाची भूमिका व कार्यनीती

3. अध्ययन प्रक्रिया
3.1 संकल्पनात्मक स्पष्टता व महत्त्व
3.2 अध्ययन प्रक्रिया उपागम
3.3 समस्या निराकरण व अध्ययन कार्यनीती
3.4 कसे शिकायचे महत्त्व व कार्यनीती

4. प्रेरणा व वर्गव्यवस्थापन
4.1 प्रेरणा
4.2 वर्गव्यवस्थापन
4.3 समूह गतिशीलता

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडानुसार नवीन ITEP अभ्यासक्रमावर आधारित

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!