आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख हे पुस्तक वाचकांना आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या मूलभूत संकल्पना, सिद्धांत आणि व्यवहारिक पैलू समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि शिथलीकरणामुळे व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून व्यवस्थापनाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आहे.
पुस्तकात आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा अर्थ, महत्त्व, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यवसायातील फरक, व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत घटक आणि प्रवेशाचे मार्ग यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. जागतिकीकरणाच्या संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यापारावरील सिद्धांत, पोर्टरचा डायमंड सिद्धांत आणि भारतीय व्यवसायावर जागतिकीकरणाचा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. व्यवसाय वातावरण, सांस्कृतिक घटक, PESTEL फ्रेमवर्क आणि धोका विश्लेषण यांचा विवेचनात्मक आढावा दिला आहे.
याशिवाय जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, UNCTAD आणि भारताची परकीय व्यापार धोरणे यांचा सखोल अभ्यास पुस्तकात समाविष्ट आहे. परकीय चलन, चलन दर प्रणाली, देयक संतुलन, परकीय थेट गुंतवणूक आणि संस्थात्मक गुंतवणूक यांचे स्पष्टीकरण दिले आहे. जागतिक पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी तसेच सांस्कृतिक विविधतेतील वाटाघाटी व संवाद यांचा आंतरराष्ट्रीय संदर्भात विचार करण्यात आला आहे.
प्रत्येक प्रकरणात आकृत्या, उदाहरणे आणि अभ्यासणार्थ प्रश्न दिलेले असून विषय अधिक स्पष्ट आणि सुलभ होईल याची काळजी घेतली आहे. विवेचन सुबोध, शास्त्रशुद्ध आणि मुद्देसूद ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे सखोल ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल.
1. आंतरराष्ट्रीय व्यवसाय
(International Business)
1.1 प्रस्तावना (Introduction)
1.2 अर्थ व व्याख्या (Meaning and Definition)
1.3 आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे महत्त्व
(Importance of International Business)
1.4 देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यवसायातील फरक
(Differences between Domestic and International Business)
1.5 आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत घटक
(Factors Influencing Growth of International Business)
1.6 आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याचे मार्ग
(Modes of Entry into International Business)
2. जागतिकीकरण
(Globalization)
2.1 प्रस्तावना (Introduction)
2.2 संकल्पना व चालक घटक (Concepts and Drivers)
2.3 आंतरराष्ट्रीय व्यापारावरील सिद्धांत (Theories of International Trade)
2.4 पोर्टरचा राष्ट्रीय लाभाचा डायमंड सिद्धांत
(Porter's Diamond Theory of National Advantage)
2.5 भारतीय व्यवसायावर जागतिकीकरणाचा परिणाम
(Impact of Globalization on Indian Business)
3. व्यवसाय वातावरण
(Business Environment)
3.1 प्रस्तावना (Introduction)
3.2 पर्यावरणीय घटक (Environmental Factors)
3.3 सांस्कृतिक वातावरण व जागतिक व्यवसायातील भूमिका (Cultural Environment and its Role in Global Business)
3.4 पेस्टल फ्रेमवर्क (PESTEL Framework)
3.5 व्यवसाय धोका विश्लेषण (Business Risk Analysis)
4. जागतिक व्यापार संघटना
(World Trade Organization)
4.1 प्रस्तावना (Introduction)
4.2 संरचना व कार्ये (Structure and Functions)
4.3 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)
4.4 जागतिक बँक (World Bank)
4.5 संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद (UNCTAD)
4.6 व्यापार गट (Business Support)
4.7 भारताची परकीय व्यापार धोरणे (India's Foreign Trade Policy)
5. परकीय चलन
(Foreign Exchange)
5.1 प्रस्तावना (Introduction)
5.2 परकीय चलनाची संकल्पना (Concept of Foreign Exchange)
5.3 चलन दर प्रणाली (Exchange Rate Mechanisms)
5.4 देयक संतुलन (Balance of Payments)
5.5 घटक व महत्त्व (Components and Significance)
5.6 परकीय थेट गुंतवणूक (Foreign Direct Investment)
5.7 परकीय संस्थात्मक गुंतवणूक (Foreign Institutional Investment)
6. जागतिक पुरवठा साखळी
(Global Supply Chain)
6.1 प्रस्तावना (Introduction)
6.2 जागतिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स
(Global Supply Chain and Logistics)
6..3 ई-कॉमर्स व आंतरराष्ट्रीय व्यवसाय
(E-Commerce and International Business)
6.4 जागतिक संदर्भातील प्रमंडळ सामाजिक जबाबदारी
(Corporate Social Responsibility in Global Context)
6.5 सांस्कृतिक विविधतेतील वाटाघाटी व संवाद
(Cross-cultural Negotiation and Communication)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - वाणिज्य (सत्र 3 व 4) (MIN) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक