अंतरीचे धावे

Author: B G Wagh
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373444987
Year: 2025
Pages: 72

सप्रेम नमस्कार,
        मला तुम्ही पुस्तक अर्पण केलं, यासाठी मी आभारी आहेच; पण तो प्रश्न गौण आहे. एका फार अधिक मोठ्या कारणासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत. एक वाचक म्हणून अभिनंदन करायचं आहे किंवा लेखक म्हणून. तुमचं हे पुस्तक वाचून मी अगदी मनापासून सांगतो - थक्कच झालो. अत्यंत तरल संवदेना, मानवी व्यवहाराचं उत्कट आकलन, जीवनाचं अंतरंग उकलून पाहण्याची विचारशीलता आणि हे सर्व सहजतेनं पेलू शकणारी खास देशी वळणाची भाषा - सर्वच मला फार वरच्या दर्जाचं वाटलं. तुमच्या लेखणीला थांबण्याचा, ‘वंध्य’ होण्याचा अधिकार नाही.


आपला, 
वि. वा. शिरवाडकर (मूळ पत्रातून)

डायरीतील पाने! चांदणं गात आहे

चिखलदरा - 28 जानेवारी
वातावरण असं शांत आहे, दूर दूर निघून जाण्याची माझ्या मनात तीव्र इच्छा होते. आजूबाजूच्या घनदाट जंगलात झाडांची शाश्वत सळसळ. ही सळसळ मला वेड लावते आहे. ही कुजबूज, हा चेंडूसारखा उसळणारा गार बेभान वारा, खळखळून हिंदकळणारी उंच उंच सुरूची झाडं, आभाळात भिडून गेलेले त्यांचे उंच शीर्ष. मला सारं विसरून जायचं आहे. ज्या गोष्टी जगाच्या दृष्टीने कसल्याही व्यवहारी मूल्याच्या नाहीत, अशा गोष्टींचा मला कोण छंद. रुक्ष पुस्तकं, फाईल्स, रजिस्टर्स, अन्‌‍‍ सर्क्युलर्स यांना पुष्कळ अर्थ असेलही; मला मात्र त्यात काही अर्थ वाटेनासा झालाय. बस्स! भरारत सुटावं, कुठल्या तरी निवांत जागी एकांतात बसावं अन्‌‍‍ तासामागून तास, दिवसामागून दिवस त्या अनंत सत्याच्या, अपार्थिव सौंदर्याच्या चिंतनात स्वत:ला विरवून टाकावं. मला असं जीवन हवंय. जिथं मी सकाळच्या वाऱ्यासारखा मुक्त असेन, सकाळच्या उन्हासारखा प्रसन्न, संध्याकाळच्या सूर्यासारखा चिंतनमग्न दिसेन.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!