‘अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन’ हे पुस्तक आधुनिक काळातील महत्त्वाच्या विषयावर शास्त्रशुद्ध आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करते. निवासी क्षेत्र, कार्यालयीन वातावरण किंवा औद्योगिक ठिकाणी उद्भवणाऱ्या आगीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उपकरणांचा वापर आणि तातडीच्या परिस्थितीत घेण्याची पावले यांचे सविस्तर वर्णन यात केले आहे. अग्निसुरक्षेची व्याख्या, महत्त्व, आगीची कारणे व प्रकार, अग्नी त्रिकोण यांसारख्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्यानंतर अग्निशमन यंत्रे, अग्नी ओळख प्रणाली, क्षेत्रीय कवायत, स्प्रिंकलर्स, होजपाईप्स आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे यांचा सखोल अभ्यास पुस्तकात दिला आहे.
हे पुस्तक चझडउ, णॠउ-छएढ, डएढ तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असून अग्निसुरक्षा क्षेत्रात कार्यरत अधिकारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठीही व्यवहार्य मार्गदर्शक ठरेल. सुबोध भाषा, अद्ययावत माहिती आणि व्यावहारिक दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अभ्यासकांना अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन या विषयाचे सर्वांगीण ज्ञान मिळवून देईल.
1. अग्नी सुरक्षा
(Fire Safety)
1.1 प्रस्तावना (Introduction)
1.2 अग्निसुरक्षेचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Defination of Fire Safty)
1.3 अग्निसुरक्षा महत्व आणि अभिप्राय
(Importance and Significance of Fire Safety)
1.4 अग्निची कारणे व प्रकार
(Causes and Types of Fire)
1.5 आगीचे घटक : अग्नी त्रिकोण (उष्णता, इंधन, प्राणवायू)
(Components of Fire : Fire Triangle [Heat, Fuel, Oxygen])
1.6 निवासी क्षेत्र आणि कार्यालयीन परिस्थितीतील सामान्य
संकटे
(Common Fire Hazards in Residential and work place
Environment)
2. अग्नि लढावू उपकरणे व तंत्र
(Fire Fighting Equipment and Techniques)
2.1 अग्निशमन यंत्र- प्रकार
(Fire fighting Equipment and Techniques)
2.2 अग्नी ओळख पध्दती
(Fire Detection System)
2.3 अग्नी झूंज तंत्र - क्षेत्रिय कवायत
(Basic Firefighting Techniques – Field Drill Practice)
2.4 अग्नीपाधा नळाचा होजपाईप्स, स्प्रिंकलर्स आणि
स्थिरपाईपचा उपयोग
(Use of Hydrants, Hoscepipes, Sprinkler and
Standpand per)
2.5 अग्नीशामकाची वैयक्तिक सुरक्षा उपकरणे
(Personal Protective Equipment (PPE) for Fire Fighters)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - संरक्षणशास्त्र (सत्र 3) (VSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक