“अध्ययन आणि अध्यापन” हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याशी सुसंगत अशा नवीन अभ्यासक्रमावर आधारित असून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड्. अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरते. या ग्रंथात शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भातील शिक्षण, बुद्धिमत्ता, अध्ययनाचे घटक, अध्यापन प्रक्रिया, वर्गातील परस्परसंवाद, मानसशास्त्रज्ञांचे सिद्धांत, सर्वांसाठी अध्यापन तसेच अध्ययन सुलभ करण्याचे विविध मार्ग यांचा सखोल आढावा घेतला आहे.
पुस्तकाची रचना NEP-2020 नुसार अद्ययावत अभ्यासक्रमाशी सुसंगत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसशास्त्रीय व सामाजिक दृष्टिकोन मांडण्यात आले आहेत. अध्यापनातील चिंतनशीलता, व्यावसायिक नीतिमत्ता आणि शिक्षकाची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला आहे. दिव्यांग, अध्ययन अक्षम, अतिक्रियाशील तसेच प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाच्या कार्यनीती स्पष्ट करण्यात आल्या आहेत. गट शिक्षण, सहकारी अध्ययन-अध्यापन, रचनावाद, ब्रुनर व ऑसुबेल यांच्या दृष्टिकोनावर आधारित ज्ञाननिर्मितीचे मार्गदर्शन या पुस्तकात दिलेले आहे.
हे पुस्तक विद्याथ, शिक्षक, संशोधक आणि शिक्षणशास्त्रातील अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरते. अध्यापन व अध्ययनाच्या प्रक्रियेला अधिक सखोल, परिणामकारक आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. शिक्षणशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन आणि अध्यापनातील नवनवीन कार्यनीती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक शिक्षक व विद्याथ यांच्यासाठी आवश्यक आहे.
1. अध्ययनाथचे आकलन
1.1 मानसशास्त्र
1.2 मानसशास्त्राचे स्वरूप
1.3 मानसशास्त्राच्या शाखा
1.4 शैक्षणिक मानसशास्त्र
1.5 शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती
2. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात शिक्षण
2.1 शिक्षण : संकल्पना (सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात)
2.2 शिक्षणाचा अर्थ (सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात)
2.3 शिक्षणावर परिणाम करणारे घटक
2.4 शिक्षणाचे परिमाण: कौशल्ये, दृष्टिकोन आणि सवयी
2.5 विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी शाळा आणि शिक्षकाची भूमिका
3. अध्ययनाथचे आकलन
3.1 बुद्धिमत्ता
3.2 बुद्धिमत्तेचा दोन घटक सिद्धांत
3.3 बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत
3.4 गिलफर्डचा बुद्धिमत्तेचा सिध्दांत
3.5 गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत
3.6 बुद्धिमत्ता चाचणी
4. अध्ययन - परिणाम करणारे घटक
4.1 अध्ययन - अर्थ
4.2 अध्ययनाची प्रक्रिया
4.3 अध्ययनाची वैशिष्ट्ये
4.4 अवधान - अर्थ, प्रकार, परिणाम करणारे घटक, शैक्षणिक महत्त्व
4.5 विद्यार्थ्यांमधील अवधानाचे होणारे विचलन थांबविण्यासाठी शिक्षकाची भूमिका
5. अध्यापनाचे आकलन
5.1 अध्यापन प्रक्रिया - संकल्पना
5.2 अध्यापन - अर्थ, स्वरूप आणि वैशिष्टे
5.3 शिक्षण आणि अध्यापनाचा संबंध
5.4 अध्यापन एक जटिल प्रक्रिया
5.5 अध्यापन एक व्यवसाय
6. वर्ग अध्यापनाचे विश्लेषण
6.1 सामाजिक गट - अर्थ
6.2 सामाजिक गटाचे प्रकार
6.3 सामाजिक गटाचे मानसशास्त्र - अर्थ
6.4 सामाजिक गटाची वैशिष्ट्ये
6.5 सामाजिक गट म्हणून शाळा
7. मानसशास्त्रज्ञांचे शिक्षणातील तत्व
7.1 पावलोव्हची अभिजात अभिसंधान उपपत्ती
7.2 थॉर्नडाइक - “साधक अभिसंधान”
7.3 कोहलर उपपत्ती - मर्मदृष्टी अध्ययन
7.4 बांदुरा - सामाजिक अध्ययन उपपत्ती
7.5 गॅग्ने- श्रेणीबध्द अध्ययन उपपत्ती
8. सर्वांसाठी अध्यापन
8.1 दिव्यांग विद्याथ
8.2 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा
8.3 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वैशिष्ट्ये
8.4 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिक्षकाची भूमिका
8.5 अध्ययन अक्षम विद्याथ
9. अध्ययन सुलभ करण्याचे मार्ग
9.1 रचनावाद (Constructivist)
9.2 सहकारी अध्ययन-अध्यापन (Cooperative Learning-Teaching)
9.3 ज्ञान निर्मितीसाठी हिल्डा टाबाचा दृष्टिकोन
9.4 हिल्डा टाबा यांच्या दृष्टिकोनाचे फायदे
9.5 प्रेरक विचार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ