अध्यापन आणि अध्ययन

Rs. 405.00
Rs. 450.00
Rs. 405.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446288
Year: 2025
Pages: 288

शिक्षकशिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांत झालेल्या व्यापक बदलांमुळे बी.एड. अभ्यासक्रमाचे स्वरूप अधिक समग्र, बहुविषयक आणि अनुभवाधारित झाले आहे. NCTE आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांच्या दिशादर्शक विचारसरणीमुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यनिर्धारण या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांचा अभ्यास आता शिक्षणाच्या संदर्भात, उपयोजनाधारित पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे, ज्यामुळे विद्याथ-शिक्षकांना शिकणाऱ्याच्या अनुभवांची रचना, अध्ययनावर परिणाम करणारे घटक आणि आधुनिक शैक्षणिक उपपत्ती यांची सखोल समज विकसित होते.
या नव्या शैक्षणिक वातावरणात प्रभावी अध्यापन, चिंतनशील अध्यापन, तंत्रज्ञानाचा वापर, वर्गव्यवस्थापन, बहुविविधता हाताळणे आणि शिक्षकाचा व्यावसायिक विकास यांसारख्या घटकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुभवाधारित, आंतरक्रियात्मक आणि विद्याथ-केंद्रित अध्यापनाच्या अपेक्षा वाढत असताना, हा ग्रंथ अध्ययन-अध्यापनाच्या संकल्पना स्पष्ट, सोप्या आणि समकालीन पद्धतीने मांडतो. क्रमिक पुस्तकासारखा सहज आणि संदर्भग्रंथासारखा सखोल असलेला हा ग्रंथ शिक्षकशिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक विश्वासार्ह आणि आवश्यक मार्गदर्शक ठरतो.

1. अध्ययन उपपत्ती व अनुदेशन कार्यनीती
1.1 अध्ययनाचे आकलन
A) अध्ययन अर्थ, व्याख्या व स्वरूप
B) अध्ययन प्रक्रिया
1.2 मानसशास्त्रीय दृष्टीकोन
1.3 अध्ययनावर परिणाम करणारे घटक
1.4 संदर्भाधारित अध्ययनाचे मार्ग
1.5 पारंपरिक अध्ययन उपपत्ती :
1.6 अध्ययनाबाबतचे भारतीय दृष्टीकोन

2. अध्ययन वातावरण व वर्गव्यवस्थापन
2.1 पॅव्हिओची द्विसंकेतन उपपत्ती
2.2 ज्ञानरचनावादी उपपत्ती
2.3 वर्गाध्यापनाच्या दृष्टीने ज्ञानरचनावादाचे उपयोजन
2.4 A) मेंदूआधारित अध्ययन
2.4 B) सूक्ष्मअध्ययन कार्यनीती व कौशल्ये
2.5 वर्गव्यवस्थापनामध्ये अध्ययनानुकूल वातावरण निर्मिती
2.6 वर्गातील बहुविविधता हाताळणे-बहुभाषिकत्त्व व बहुसांस्कृतिकत्त्व वैविध्याच्या गरजा

3. अध्यापनाचा मूलाधार
3.1 अध्यापनाची संकल्पना : अध्यापनाचा अर्थ व व्याख्या
3.2 अध्यापन प्रक्रिया
3.3 सूक्ष्म अध्यापन कौशल्ये अर्थ, व्याख्या व पद्धती
3.4 तंत्रज्ञान आधारित अध्यापन : वार्षिक नियोजन, घटक नियोजन पाठनियोजन व डिजिटल पाठ 3 नियोजनाची गरज व महत्त्व
3.5 चिंतनशील अध्यापन व व्यावसायिक विकास
3.6 अध्यापनाचे NEP 2020 शी एकात्मीकरण

4. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भात प्रभावी अध्यापन व शिक्षकाचा विकास
4.1 विद्याथ आकलन स्तरासंदर्भात - प्रभावी अध्यापन संकल्पना : अर्थ व्याख्या व प्रभावी अध्यापनाचे निकष
4.2 अध्यापनाचे दृष्टीकोन
4.3 अध्यापनाची प्रतिमाने : संकल्पना, वैशिष्टये, कुले आणि वर्गाध्यापना साठी उपयोजन
4.4 अध्यापनाचे प्रकार :
4.4.1 सांघिक अध्यापन - संकल्पना आणि अध्यापनात उपयोग
4.4.2 आंतरक्रियात्मक अध्यापन संकल्पना व महत्त्व
4.5 अध्यापन एक उदात्त व्यवसाय
4.6 NEP 2020 नुसार शिक्षकाच्या व्यवसाय विकास कार्यक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या बी.एड्. नवीन अभ्यासक्रमासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!