अभ्यासक्रमांतर्गत भाषा

Rs. 120.00
Rs. 150.00
Rs. 120.00
(-20%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373440415
Year: 2026
Pages: 122

‘अभ्यासक्रमांतर्गत भाषा’ हे पुस्तक भाषेला केवळ विषय म्हणून न पाहता शिक्षणाच्या प्रत्येक घटकाची आधाररचना म्हणून अधोरेखित करते. भाषा ही विचारांची, संस्कृतीची आणि ज्ञानाची वाहक असल्याने तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या बहुभाषिकतेच्या आणि मातृभाषेतून शिक्षणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून या पुस्तकात भाषिक कौशल्यांचा विकास, अध्यापनातील नवकल्पना आणि डिजिटल साधनांचा उपयोग यांचे सखोल विवेचन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या विविधतेचा आदर करून शिक्षकांना प्रभावी, सहभागी आणि संवेदनशील अध्यापन करता यावे, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि विद्याथ-केंद्रित दृष्टिकोनातून मांडलेले हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांसाठी प्रेरणादायी साथीदार ठरेल.
आजच्या डिजिटल युगात शिक्षण अधिक गतिमान आणि संवादात्मक झाले आहे. ई-साधने, मल्टिमीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने भाषा अध्यापन अधिक आकर्षक आणि परिणामकारक बनवता येते. या पुस्तकात अशा आधुनिक साधनांचा उपयोग करून अध्यापन समृद्ध करण्याचे मार्गदर्शन दिले आहे, ज्यामुळे शिक्षकांना नव्या शैक्षणिक आव्हानांना समर्थपणे सामोरे जाता येईल.

1. अभ्यासक्रमांतर्गत भाषा
(Language across Curriculum)
2. भाषिक कौशल्ये 35
(Language Skills)
3. भाषेची कार्ये आणि कृति आराखडा
(Utility of Language and Action Plan)

4. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वर्गातील भाषाशैली
(Classroom Languages of the Teacher and Student)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर बी.एड. (प्रथम वर्ष) प्रथम सत्र नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक... तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!