‘आयात आणि निर्यात व्यवस्थापन’ हे पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना परकीय व्यापाराच्या मूलभूत संकल्पना सखोलपणे समजावून सांगते.
यामध्ये परकीय व्यापाराचा अर्थ, आर्थिक विकासातील आयात-निर्यातीचे महत्त्व, भारतीय परकीय व्यापार धोरणाचा आढावा, संस्थात्मक रचना, निर्यात प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे, विदेश व्यापारातील बँकांची भूमिका, निर्यात पत व विमा, तसेच आयात परवाना व नोंदणी पद्धती यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे. संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी आकृत्या व उदाहरणांचा वापर करून विषय सुलभ करण्यात आला आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल. वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील अभ्यासकांना परकीय व्यापाराचे सखोल ज्ञान मिळवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.
1. परकीय व्यापार व आयात निर्यात धोरण
1.1 परकीय व्यापाराचा अर्थ
(Meaning of Foreign Trade)
1.2 आर्थिक विकासातील आयात निर्यातीचे महत्त्व/परकीय व्यापाराचे महत्त्व (Importance of Foreign Trade)
1.3 भारतीय परकीय व्यापार धोरणाचा आढावा
(Overview of India’s Foreign Trade Policy)
1.4 परकीय व्यापारातील संस्थात्मक रचना
(Institutional Framework of Foreign Trade)
2. निर्यात प्रक्रिया आणि कागदपत्रे/ दस्तऐवज
2.1 निर्यात आदेश प्रक्रिया/ निर्यात ऑर्डर प्रक्रिया
(Export Order Processing)
2.2 निर्यात दस्तऐवज - बिजक, पॅकिंग लिस्ट, मूळ प्रमाणपत्र आणि शिपिंग बिल (Export Documentation - Invoice, Packing List, Certificate of Origin, Shipping Bill)
2.3 विदेश व्यापारातील बँकांची भूमिका
(Role of Banks in Foreign Trade)
2.4 भारतीय निर्यात पत हमी महामंडळ
(Export Credit Guarantee Corporation of India)
3. आयात परवाना आणि नोंदणी
3.1 माल नोंद पत्र, पतपत्र आणि गलबतावर भरणा केलेल्या मालाची यादी
3.2 सीमा शुल्क आणि मूल्यावपात-प्रतिबंध शुल्क
(Customs Duty & Anti - Dumping Duties)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - वाणिज्य (सत्र 4) (MIN) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक