हा जो भूतकाळ
वारंवार येतोय मला भेटायला
त्याच्या चेहऱ्यावर
दिसत असतात मला
वेदनेचे काळे चट्टे
मी जगतोय
वर्तमानासोबत
तर वर्तमानही
अधिकच उदासलाय
माझ्या भविष्याचा
चेहराच गायब करण्याच्या
हालचाली जाणवताहेत मला
आता तरी
सारी शक्ती एकवटून
लढायला हवेच
या जुलमी काळ्या व्यवस्थेविरूद्ध