आरोग्य मानसशास्त्र

Rs. 266.00
Rs. 295.00
Rs. 266.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373449135
Year: 2025
Pages: 218

आरोग्य मानसशास्त्र हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीतील ताण, मानसिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि वाचकांना मार्गदर्शन करणारे आहे. आरोग्य मानसशास्त्र हा विषय केवळ शारीरिक आरोग्याकडे पाहत नाही, तर जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातून आरोग्य आणि आजार यांचा अभ्यास करतो.

या पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे, ऐतिहासिक विकास, जैविक अधिष्ठान, जैववैद्यकीय व जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातील तुलना, तसेच आरोग्य विषयक वर्तन यांचे सविस्तर विवेचन केले आहे. ताण, त्याचे प्रकार, स्त्रोत, शारीरिक व मानसिक परिणाम, ताण निवारणाच्या पद्धती आणि ताण व्यवस्थापनाच्या तंत्रांचा सुलभ आढावा घेतला आहे.

पुस्तकात आकृत्या, तक्ते, चार्ट आणि आवश्यक इंग्रजी संज्ञांचा वापर करून संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विषय नव्याने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहज समजेल. हे पुस्तक अभ्यासक्रमाशी सुसंगत असून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे, तसेच जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

1. आरोग्य मानसशास्त्राची ओळख
(Introduction to Health Psychology)
1.0 आरोग्य मानसशास्त्र : व्याख्या, स्वरूप आणि उद्दिष्टे
(Health Psychology : Definition, Nature and Aims) :
1.1 आरोग्य मानसशास्त्राच्या विकासाचा ऐतिहासिक संदर्भ
(Historical Background to the Development of Health Psychology)
1.2 आरोग्य व आजारांचे जैविक अधिष्ठान
(Biological Foundation of Health and Illness)
1.3 जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोन व जैववैद्यकीय दृष्टिकोन यातील तुलनात्मक विश्लेषण
(Biopsychosocial Model vs. Biomedical Model)
1.4 आरोग्य विषयक प्रक्रियांमध्ये मानसशास्त्राची भूमिका
(Psychology's Role in Health)
1.5 आरोग्य व आजार विषयक वर्तन: संकल्पना व प्रकार
(Health and Illness Behaviour: Definitions and Types)

2. आरोग्यात ताण व ताण निवारण
(Stress and Coping in Health)
2.1 ताणाची व्याख्या व प्रकार (Definition and Types of Stress - Acute, Chronic, Eustress, Distress)
2.2 ताणाचे मुख्य स्त्रोत (Major Sources of Stress - Life Events, Daily Hassles, Environmental Other Stressors)
2.3 ताणाचे शारीरिक व मानसिक परिणाम
(Physiological and Psychological Effects of Stress)
2.4 ताण निवारणाच्या पद्धती
(Coping Strategies - Problem-focused and Emotion-focused Coping)
2.5 ताण व्यवस्थापनाचे तंत्र
(Stress Management Techniques- Relaxation, Mindfulness, Cognitive Restructuring)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष कला - मानसशास्त्र (सत्र 1) (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!