आधुनिक भारताचे राजकीय विचार

Rs. 176.00
Rs. 195.00
Rs. 176.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373440477
Year: 195
Pages: 130

या पुस्तकात आधुनिक भारताच्या लोकशाही विचारांची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख राजकीय विचारवंतांचे अध्ययन करण्यात आले आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विचारांची पेरणी या विचारवंतांनी केली असून भारतीय लोकशाही नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची हमी देते. या पार्श्वभूमीचे सुलभ आकलन व्हावे म्हणून हे पुस्तक तयार केले आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले, तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे आधुनिक राजकीय व्यवस्थेची रचना केली. संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान अनमोल आहे आणि म्हणूनच या पुस्तकात महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या राजकीय विचारांवर विशेष प्रकाश टाकला आहे. गांधींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सर्वोदय व हिंद स्वराज्य यांसारख्या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांचा जीवनपरिचय, प्रभाव आणि पंचसूत्री यांचा उलगडा केला आहे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांचा जीवन प्रवास, त्यांच्यावर पडलेले प्रभाव व प्रमुख विचार मांडले आहेत. अस्पृश्यता, संविधानवाद, सामाजिक न्याय, आरक्षण, महिला स्वातंत्र्य व हिंदू कोड बिल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गांधींचे राष्ट्रवाद, धर्म-राजकारण, आरोग्य, स्वच्छता व वंचितांसाठीचे विचार विशद केले आहेत, तर डॉ. आंबेडकरांचे उदारमतवाद, राष्ट्रवाद, राज्य समाजवाद, धर्मनिरपेक्षता व बौद्ध धर्मावरील विचार समजावले आहेत. सहज-सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक व वाचकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

1. महात्मा गांधींच्या मुख्य संकल्पना
1.1 राजकीय विचारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थ
1.2 सत्य, अर्थ आणि प्रकार.
1.3 अहिंसा - अर्थ, प्रकार, जागतिक शांततेत अहिंसेची भूमिका
1.4 सत्याग्रह - अर्थ, प्रकार आणि सर्वेादय
1.5 विश्वस्तता, हिंद स्वराज - अर्थ आणि उद्दिष्टे.

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य संकल्पना
2.1 भारतीय समाज, जात, वर्ण आणि अस्पृश्यतेची पार्श्वभूमी.
2.2 भारतीय संविधान, संविधानवाद.
2.3 सामाजिक विचार - समानता, मूलभूत अधिकार
2.4 सामाजिक न्याय आणि आरक्षण
2.5 महिला स्वातंत्र्य, हिंदू कोड बिल.

3. म. गांधीजींचे राजकीय आणि सामाजिक कल्याणकारी विचार
3.1 अस्पृश्यता आणि सांप्रदायिक सलोखा.
3.2 महिला, शिक्षण आणि राष्ट्रवाद यावर गांधीजींचे विचार.
3.3 धर्म आणि राजकारण.
3.4 आरोग्य, स्वच्छतेवर गांधीजींचे विचार.
3.5 शेतकरी, कामगार, आदिवासी समुदाय आणि अल्पसंख्याकांवर महात्मा गांधीजींचे विचार

4. डॉ. आंबेडकरांचे राजकीय आणि धार्मिक विचार
4.1 उदारमतवाद, राष्ट्र, राष्ट्रवाद.
4.2 लोकशाही, संसदीय लोकशाही
4.3 राज्य समाजवाद, राजकीय प्रतिकाराचा सिद्धांत.
4.4 धर्मनिरपेक्षता, हिंदू धर्मावरील विचार
4.5 बौद्ध धर्म आणि धर्मांतर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - राज्यशास्त्र (सत्र 3 व 4) (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!