प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र (भाग 2)

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443256
Year: 2026
Pages: 94

प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षा, छएढ-डएढ च्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल. अभ्यासक्रमातील महत्त्वाचे विषय जसे की पैशाचा पुरवठा व मागणी, चलनवाढ व महागाईचे प्रकार, व्यापार चक्र, सार्वजनिक आय-व्यय, कर व खर्च, सार्वजनिक कर्ज, अर्थसंकल्प तसेच समग्रलक्षी आर्थिक धोरणे यांचा सखोल व सोप्या भाषेत आढावा घेण्यात आला आहे.
प्रत्येक प्रकरणात संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आकृती व तक्त्यांचा वापर केला असून विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी मांडणी केली आहे. आधुनिक आर्थिक घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
लेखकांनी मूळ अर्थाला बाधा न आणता संकल्पना सुस्पष्ट व सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम समजून घेण्यास सहाय्यक ठरेल, तर प्राध्यापकांसाठी अध्यापनात उपयुक्त ठरेल.
या पुस्तकाची खासियत म्हणजे अभ्यासक्रमाशी थेट सुसंगतता आणि आधुनिक आर्थिक घडामोडींचा समावेश. डिजिटल चलन, पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, लॉफर वक्र यांसारख्या नव्या संकल्पना विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देतात. परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून दिले असल्यामुळे हे पुस्तक आत्मविश्वासाने अभ्यास करण्यास मदत करते.

1. पैशाचा पुरवठा
1.1 पैशाचा अर्थ व कार्ये
1.1.1 पैशातील अलीकडील घडामोडी : डिजिटल चलन
1.2 पैशाचा पुरवठा
1.2.1 रिझर्व्ह बँकेचे पैशाच्या पुरवठ्याची मापने
1.2.2 पैशाची तरलता मोजमापे
1.3 व्यापारी बँकांची पतनिर्मिती
1.3.1 पत नियंत्रण - उद्दिष्टे व साधने

2. पैशाची मागणी
2.1 पैशाची मागणी : अर्थ व निर्धारक
2.2 पैशाच्या मागणीचे हेतू
2.3 पैशाच्या मागणीचे सिद्धांत
2.3.1 फिशरचादृष्टीकोन/फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत
2.3.2 केंब्रीज दृष्टीकोन

3. चलनविस्तार/भाववाढ
3.1 चलनवाढ, चलनघट, मंदियुक्त चलनवाढ : अर्थ व व्याख्या
3.2 भाववाढीचे/चलन विस्ताराचे प्रकार
3.3 भाववाढ/चलन विस्तार/महागाईची कारणे
मागणी ताणनिर्मित आणि खर्चदाबनिर्मित चलन विस्तार
3.4 चलनवाढीचे मापन : ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांक
3.5 चलन विस्ताराचे/भाववाढीचे परिणाम

4. व्यापार चक्र
4.1 व्यापार चक्र अर्थ आणि व्याख्या
4.2 व्यापार चक्राची वैशिष्ट्ये
4.3 व्यापार चक्राच्या अवस्था
4.4 व्यापार चक्र विरोधी उपाय योजना

5. सार्वजनिक आयव्यय
5.1 सार्वजनिक आयव्यय अर्थ व व्याख्या
5.2 करांचे प्रकार
5.3 सार्वजनिक खर्च
5.4 सार्वजनिक कर्ज : अर्थ आणि महत्व
5.5 अर्थसंकल्प/अंदाजपत्रक - संकल्पना आणि प्रकार
5.5.1 वित्तीय तूट आणिमहसूली तूट

6. समग्रलक्षी आर्थिक धोरणे
6.1 समग्रलक्षी आर्थिक धोरणांचा अर्थ
6.2 मुद्रावाद/चलनवाद आणि पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र
6.2.1 मुद्रावादाचे प्रमुख घटक
6.2.2 पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र
6.2.3 लॉफर वक्र
6.3 पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राचे टीकात्मक परीक्षण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष वाणिज्य (सत्र 4) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!