महाराष्ट्राचा इतिहास हा समाजपरिवर्तनाच्या चळवळींनी समृद्ध आहे. विसावे शतक हे सामाजिक जागृतीचे आणि विषमतेविरुद्ध लढ्याचे शतक म्हणून ओळखले जाते. या काळात अनेक समाजसुधारकांनी जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथा मोडून काढल्या. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि स्त्री-पुरुष समानतेची नवी दिशा दिली.
या पुस्तकात राजष शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महष शिंदे, महष कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे, बाबा आढाव अशा थोर सुधारकांचे विचार आणि कार्य सोप्या भाषेत मांडले आहे.
1. प्रारंभिक सुधारक (Early Reformers)
अ) राजष शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj)
ब) महष वि. रा. शिंदे (Maharshi V. R. Shinde)
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)
2. शैक्षणिक सुधारक (Educational Reformers)
अ) महष धोंडो केशव कर्वे (Maharshi D. K. Karve)
ब) कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil)
क) पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh)
3. सामाजिक-राजकीय सुधारक (Socio-Political Reformers)
अ) संत गाडगे महाराज (Sant Gadge Maharaj)
ब) प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackerey)
क) बाबा आढाव (Baba Adhav)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 4) (MIN) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक