19 व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक

Rs. 117.00
Rs. 130.00
Rs. 117.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373449708
Year: 2025
Pages: 58

‘19व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील सामाजिक पुनर्रचनेच्या प्रवासाचा जिवंत साक्षीदार आहे. नवजागरणाच्या प्रारंभी बालशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ आणि लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांनी आधुनिक विचारधारेची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या लेखनातून आणि कृतीतून समाजमन जागृत झाले, नव्या विचारांचे बीज रोवले गेले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्रीमुक्ती आणि जातीय समतेसाठी अथक संघर्ष केला आणि सामाजिक समरसतेचा पाया रचला. ताराबाई शिंदेच्या लेखनातून स्त्रीवादी दृष्टिकोनाची ठाम अभिव्यक्ती झाली, तर बदरुद्दीन तैयबजी यांनी धर्मनिरपेक्षतेचा उदात्त आदर्श समाजासमोर ठेवला.
शतकाच्या उत्तरार्धात नारायण मेघाजी लोखंडे, न्यायमूत महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांनी आधुनिकतेचा नवप्रभात उगवला. त्यांच्या कार्यातून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय सुरू झाला. शिक्षण, समता आणि आधुनिकतेच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा गौरवशाली इतिहास या ग्रंथात सुसंगतपणे उलगडला आहे.

1. आरंभीचा टप्पा
(Early Phase)
अ) बाळशास्त्री जांभेकर
ब) जगन्नाथ शंकरशेठ
क) गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)

2. 19 व्या शतकाचा मध्यकाल
(Mid-Nineteenth Century)
अ) महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले
ब) ताराबाई शिंदे एक धाडसी स्त्रीवादी विचारवंत
क) बद्रुद्दीन तय्यबजी

3. आधुनिकतेचा उदय
(Coming of Modernity)
अ) नारायण मेघाजी लोखंडे
ब) न्यायमूत महादेव गोविंद रानडे
क) गोपाळ गणेश आगरकर
संदर्भग्रंथ सूची

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 3) (MIN) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!