महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा ग्रंथ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केलेला असून संशोधक, विद्याथ तसेच एमपीएससी, नेटसेट आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात राज्याचे भौगोलिक स्थान, शेजारील राज्ये, प्रशासकीय विभाग, पर्वत, पठार, मैदान, कोकण किनारपट्टी, नदी प्रणाली, हवामान, मृदा प्रकार आणि वनसंपदा यांचे सखोल व समर्पक विवेचन केलेले आहे.
प्रमुख नद्यांचे उगमस्थान, उपनद्या आणि पाणलोट क्षेत्र यांचा सविस्तर आढावा घेतला असून हवामानावर परिणाम करणारे घटक, ऋतूंची वैशिष्ट्ये आणि हवामानातील विविधता यांचे स्पष्ट विश्लेषण आकृत्या व नकाशांच्या साहाय्याने सादर केले आहे. मृदा प्रकार व वितरण, मृदा संवर्धन, वनांचे प्रकार व संवर्धन यांचे विवेचन करून महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनांचे शास्त्रीय विश्लेषण आणि संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
सोप्या भाषेतील विवेचन, नकाशे आणि आकृत्यांचा योग्य वापर यामुळे हा ग्रंथ विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या भूगोलाची स्पष्ट, शास्त्रीय आणि अभ्यासकाभिमुख ओळख करून देतो. शैक्षणिक अभ्यासक्रमाशी सुसंगत राहून तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हा ग्रंथ एक विश्वासार्ह संदर्भस्रोत ठरतो.