भूरूपशास्त्राची मुलतत्वे

Rs. 149.00
Rs. 165.00
Rs. 149.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443607
Year: 2025
Pages: 108

‘भूरूपशास्त्राची मूलतत्त्वे’ हे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या ग्रंथात भूरूपशास्त्रातील संकल्पना, सिद्धांत आणि संज्ञा सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत, जे  विषयाची मूलभूत समज विकसित करण्यात मदत करतात.
पुस्तकात भूरूपशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, विविध शाखा आणि त्याचे शैक्षणिक व व्यावहारिक महत्त्व यांचे सविस्तर विवेचन आहे. खंड व महासागरांची निर्मिती, भूपट्ट-तबकडी सिद्धांत, सागरतळ विस्तार आणि भूकवचाच्या हालचाली यांचे विश्लेषण अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे.
विदारणाचे प्रकार, नदीच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचे आकृत्यांसह स्पष्टीकरण, तसेच सागरी लाटांमुळे तयार होणाऱ्या भूरूपांचे विश्लेषण या ग्रंथात समाविष्ट आहे. याशिवाय, आधुनिक काळातील भूरूपशास्त्राची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि पर्यटन व अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूआकृती स्थळे यांची माहितीही विस्तृतपणे दिली आहे.
हे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचे मूलभूत ज्ञान, सिद्धांत आणि उपयोजित पैलू समजावून देण्याचा प्रयत्न करते आणि स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास व संशोधनासाठी एक विश्वासार्ह स्रोत आहे.

1. भूरूप शास्त्राची ओळख
(Introduction of Geomorphology)
1.1 भूरूपशास्त्राची ओळख आणि व्याख्या
1.2 भूरुपशास्त्राचे स्वरूप
1.3 भूरुपशास्त्राची व्याप्ती
1.4 भूरूपशास्त्राच्या शाखा
1.5 भूरूपशास्त्राचे महत्व

2. भू-विवर्तन आणि भूकवचाच्या हालचाली
(Tectonics and Crustal Movements)
2.1 खंड आणि महासागरांची निर्मिती
2.1.1 भूविवर्तनकी/भूपट्ट किंवा तबकडी सिद्धांत
2.1.2 सागरतळ विस्तार सिद्धांत
2.2 भूकवचाच्या हालचालींचे वगकरण
2.2.1 मंदगतीच्या हालचाली
2.2.2 शीघ्र हालचाली

3. विदारण
(Weathering)
3.1 विदारणाची व्याख्या
3.2 विदारणाचे प्रकार
3.2.1 कायिक विदारण
3.2.2 रासायनिक विदारण
3.2.3 जैविक विदारण

4. अपक्षरण आणि निक्षेपण कारके
(Agents of Erosion and Deposition)
4.1 अपक्षरण आणि निक्षेपण यामुळे निर्माण होणारी नदीची भूरूपे
4.2 सागरी लाटांमुळे निर्माण होणारी अपक्षरण आणि निक्षेपण भूमी स्वरूपे

5. उपयोजित भूरुपशास्त्र
(Applied Geomorphology)
5.1 उपयोजित भूरूप शास्त्राची व्याख्या आणि महत्व
5.2 भूआकृती स्थळे
5.3 मानवी क्रियाकलाप (मानवी क्रिया संकल्पना) आणि भूरूपशास्त्र
5.3.1 भूरूपशास्त्र आणि मानवी वस्ती
5.3.2 भूरूपशास्त्र आणि खाणकाम यांचा संबंध
5.3.3 भूरूपशास्त्र आणि नागरीकरण यांचा संबंध
5.3.4 भूरूपशास्त्र आणि मृदा ऱ्हास यांचा संबंध

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - भूगोल (सत्र 3) (Major) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!