भारतीय भौगोलिक ज्ञान

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9788199121300
Year: 2025
Pages: 94

‘भारतीय भौगोलिक ज्ञान’ हे पुस्तक प्राचीन भारताच्या समृद्ध भौगोलिक परंपरेचा अभ्यास सुसंगतपणे मांडणारे असून, त्यामधील सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर समन्वय साधलेला आहे. वैदिक वाङ्मय, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे तसेच बौद्ध व जैन साहित्य यातील भूगोलाशी संबंधित विचार व वर्णने अभ्यासातून उलगडले आहेत. नद्या, पर्वत, दिशांपासून ते खंड, देश व मानवी जीवन यामधील निसर्गाशी असलेले नाते अभ्यासताना विद्यार्थ्यांना एक नवी अंतर्दृष्टी मिळते. या ज्ञानाचा आजच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात उपयोग कसा करता येईल, हेही या पुस्तकातून समजते.
पुस्तकातील विशेष बाब म्हणजे गांधीवादी भौगोलिक विचारांचा समावेश. ग्रामस्वराज, स्वयंपूर्णतेची संकल्पना, पर्यावरणपूरक शेती, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामानातील बदलांसोबत जगण्याची कौशल्ये यांचा अभ्यास या ठिकाणी विस्ताराने करण्यात आला आहे. तसेच प्राचीन भारतातील अंतर्देशीय व सागरी व्यापारी मार्ग, वेधशाळा, स्थापत्यकला, शेतीविषयक परंपरा, ऋतूनुसार सण-उत्सव आणि पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान यांचाही विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाला अनुरूप अशी रचना व उपयुक्त दृष्टिकोन यामुळे हे पुस्तक भूगोल विषयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या पलीकडे नेणारे, विचार समृद्ध करणारे आणि भारतीय ज्ञान परंपरेचा अभिमान वाटावा असे ठरणारे आहे.

1. भारतीय भौगोलिक ज्ञानाचा परिचय
1.1 भारतीय भौगोलिक ज्ञानाची संकल्पना
1.2 भारतीय भौगोलिक ज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती
1.2.1 भारतीय भौगोलिक ज्ञानाचे स्वरूप
1.2.2 भारतीय भौगोलिक ज्ञानाची व्याप्ती
1.3 भारतीय भौगोलिक ज्ञानाच्या प्रतिमानांवर आधारित दृष्टिकोन
1.4 प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय भौगोलिक ज्ञान

2. भारतीय भौगोलिक ज्ञान
2.1 प्राचीन भारतीय भौगोलिक साहित्य
2.1.1 वैदिक कालीन भारतीय भौगोलिक साहित्य
2.1.2 पुराणांतील भौगोलिक साहित्य
2.1.3 रामायणातील भौगोलिक साहित्य
2.1.4 महाभारतातील भौगोलिक साहित्य
2.1.5 बौद्ध साहित्यातील भौगोलिक साहित्य
2.1.6 जैन साहित्यातील भौगोलिक साहित्य
2.1.7 गांधीवादी तत्त्वज्ञानातील भौगोलिक साहित्य
2.2 प्राचीन भारतातील भूगोलविषयक संकल्पना
2.2.1 ग्रहणे (Eclipses)
2.2.2 पृथ्वीविषयक संकल्पना (Concept of The Earth)
2.2.3 अक्षांश आणि रेखांश (Latitude and Longitude)
2.2.4 वातावरण (Atmosphere)
2.2.5 हवा आणि हवामान (Weather and Climate)
2.2.6 खगोल मंडळाचे विभाजन (पंचांग)
2.2.7 ग्रहगणना (Planetary Computation)
2.3 प्राचीन भारताचा प्रादेशिक भूगोल: खंड, भारतवर्ष, पर्वते व नद्या
2.3.1 सप्तद्वीप आणि प्राचीन खंड संकल्पना
2.3.2 भारतवर्षाची संकल्पना
2.3.3 प्राचीन पर्वतरांगा
2.3.4 प्राचीन भारतातील नद्या
2.4 गांधीवादी प्रादेशिक विकासाची संकल्पना आणि ग्रामस्वराज: एक सूक्ष्म प्रादेशिक दृष्टिकोन
2.4.1 गांधीवादी प्रादेशिक विकास संकल्पनेची मूलभूत तत्त्वे
2.4.2 ग्रामस्वराज: एक सूक्ष्म प्रादेशिक दृष्टिकोन

3. भूगोलातील भारतीय ज्ञानाच्या पद्धती
3.1 प्राचीन व्यापारी मार्ग (अंतर्देशीय व्यापारी भूमार्ग आणि समुद्री व्यापारी मार्ग)
3.2 ऐतिहासिक भारतातील वेधशाळा - राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश
3.3 भारतीय भौगोलिक ज्ञान आणि सांस्कृतिक पद्धती. (शेती, उत्सव, वास्तुकला)
3.4 शेती, वास्तुकला, संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरण संबधी गांधीवादी दृष्टिकोन
3.5 हवामान अनुकूलनासाठी गांधीवादी तत्वज्ञान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला (IKS) वर्गाच्या तसेच इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!