कृषी आधारित उद्योग आणि खानदेश

Rs. 212.00
Rs. 235.00
Rs. 212.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446325
Year: 2026
Pages: 156

कृषी आधारित उद्योग आणि खानदेश हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020नुसार तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रमाशी सुसंगत असून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना उपयुक्त ठरेल. कृषी आधारित उद्योगांचा परिचय, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, औद्योगिक विकासात शेतीची भूमिका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे महत्त्व यांचे सुलभ विवेचन या पुस्तकात केले आहे.

खानदेश प्रदेशातील विविध कृषी उद्योग—केळी प्रक्रिया, दाल मिल, पीठ गिरण्या, फळ प्रक्रिया, डेअरी उद्योग, मसाले उत्पादन, पशुखाद्य, शीतगृह सेवा, कृषी पर्यटन आणि कृषी सेवा केंद्र—यांचा सविस्तर आढावा येथे दिला आहे. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक टप्पे, व्यवसाय मॉडेल्स, परवाना-नोंदणी, बौद्धिक संपदा यांची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.

सरकारी सहाय्य व प्रोत्साहन योजनांमध्ये मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, नाबार्ड व इतर संस्थांची भूमिका यांचा समावेश करून पुस्तक अधिक व्यवहार्य बनवले आहे. भविष्यातील संधी, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर, हवामान अनुकूल उद्योग, नवकल्पना व संशोधन, तसेच खानदेशातील यशस्वी उद्योजकांचे केस स्टडीज यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.

हे पुस्तक कृषी उद्योगांच्या सामाजिक-आर्थिक परिणामांची जाणीव करून देत ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शाश्वततेच्या दिशेने मार्गदर्शन करते. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि उद्योजकांना कृषी आधारित उद्योगांचे स्वरूप, प्रक्रिया आणि संधी समजून घेण्यासाठी हे ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.

1. कृषी आधारित उद्योग-परिचय
(Introduction of Agro based Industries)
1.1 कृषी आधारित उद्योग-अर्थ व व्याख्या
1.2 भारतातील कृषी आधारित उद्योगांची ऐतिहासिक पार्श्वभूमी व उत्क्रांती
1.3 औद्योगिक विकासात शेतीची भूमिका
1.4 भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी-आधारित उद्योग विरुद्ध गैर-कृषी आधारित उद्योग
1.5 भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी आधारित उद्योगाचे महत्त्व

2. कृषी-आधारित उद्योगाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्व आणि सामाजिक-आर्थिक परिणाम
(Importance of Agro based Industry in Rural Economy and Socio-economic Impact)
2.1 कृषी-आधारित उद्योगांची ग्रामीण रोजगार निर्मितीत भूमिका
2.2 ग्रामीण क्षेत्रात सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची केस स्टडीज
2.3 कृषी उद्योजकतेद्वारे महिला व युवा सक्षमीकरण
2.4 स्थानिक मूल्यवर्धनाद्वारे समावेशी विकास
2.5 कृषी आधारित उद्योगांमध्ये शाश्वत आणि पर्यावरणीय विकासाचे पैलू

3. खानदेश प्रदेशात कृषी आधारित उद्योगांचे प्रकार
(Types of Agro-based Industries in Khandesh Region)
3.1 खानदेश प्रदेशाचा आढावा (जळगाव, धुळे, नंदुरबार मधील कृषी-आधारित उद्योग)
3.1.1 केळी (पिकवणे, चिप्स, पल्प, पावडर इत्यादी)
3.1.2 कडधान्य आणि तृणधान्ये (दाल मिल, पीठ गिरण्या)
3.1.3 फळे (जॅम, ज्यूस, निर्जलीकरण, पल्प पॅकेजिंग)
3.1.4 डेअरी उद्योग (दूध संकलन केंद्र, दुग्धजन्य पदार्थ, पनीर इ.)
3.1.5 पापड आणि मसाले उत्पादन
3.1.6 पशुखाद्य (मक्याचा भरडा, इतर धान्याचे खाद्य युनिट)
3.1.7 शीतगृह आणि गोदाम सेवा
3.1.8 कृषी पर्यटन
3.1.9 कृषी सेवा केंद्र आणि भाडेतत्त्वावरील कृषी उपकरणे

4. कृषी आधारित उद्योगाची सुरुवात-आवश्यकता व प्रक्रिया
(Starting Agro-based Industries-Requirement and Process)
4.1 कृषी आधारित उद्योग उभारणीच्या पायऱ्या किंवा टप्पे
4.2 व्यवसाय मॉडेल
4.2.1 एकल मालकी
4.2.2 भागीदारी
4.2.3 खाजगी मालकीची व्यावसायिक संस्था/कंपनी
4.2.4 एकल व्यक्ती कंपनी/वन पर्सन कंपनी
4.2.5 मर्यादित दायित्व भागीदारी
4.2.6 शेतकरी उत्पादक संघटना
4.2.7 स्वयंसहायता गट
4.3 परवाना, नोंदणी आणि स्थानिक उत्पादनाचे महत्त्व
4.4 पेटंट आणि ग्रामीण उत्पादनासाठी बौद्धिक संपदा

5. सरकारी सहाय्य आणि प्रोत्साहन
(Government Support and Incentives)
5.1 आर्थिक/ वित्तीय योजना
5.2 स्टार्ट अप इंडिया आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग नोंदणी
5.3 मुद्रा योजना - लहान युनिट्ससाठी कर्ज
5.4 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
5.4.1 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम-उद्योजकता सहाय्य
5.4.2 पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
5.5 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
5.6 कृषी पायाभूत सुविधा निधी - गोदाम व शीतगृह
5.7 राज्यस्तरीय प्रोत्साहन पॅकेज योजना - 2019
5.8 कृषी आधारित उद्योग विकासासाठी नाबार्ड, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, लघू शेतकरी कृषी व्यवसाय संघ यांची भूमिका
5.9 सरकारी मदत आणि प्रोत्साहन अंतर्गत भांडवली गुंतवणुकीवर अनुदान यंत्रसामग्री, विज बँक कर्जावरील व्याज
5.10 कृषी आधारित उद्योगांना कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी आणि कृषी विद्यापीठाद्वारे तांत्रिक सहाय्य

6. भविष्यातील शक्यता आणि आव्हाने
(Future Prospects and Challenges)
6.1 कृषी उद्योगातील उदयोन्मुख संधी
6.2 डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ई-मार्केटिंगचा कृषी आधारित उद्योगांमध्ये वापर
6.3 हवामान अनुकूल कृषी उद्योग विकसित करणे
6.4 कृषी आधारित उद्योगांमध्ये नवकल्पना आणि संशोधनाची भूमिका
6.5 कृषी उपक्रमांमधील मर्यादा आणि जोखीम व्यवस्थापन
6.6 खानदेशातील यशस्वी उद्योजकांचे केस स्टडीज

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष कला - अर्थशास्त्र (सत्र 3 व 4) (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!