{"product_id":"yudhaniti-vicharvant","title":"युद्धनीती विचारवंत","description":"\u003cp\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या युगात राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी विचारसरणी या विषयांचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. युद्ध, संरक्षण आणि रणनीती यांवरील चिंतन केवळ सैनिकांसाठीच नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकासाठी आवश्यक आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन आणि आधुनिक युद्धतत्त्वज्ञानाचा विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. प्रारंभी लष्करी संस्कृती, व्याख्या व संकल्पना, तसेच रणनीतीचे विविध प्रकार यांचे स्पष्ट विवेचन दिले आहे.  \u003cbr\u003eआचार्य कौटिल्यांचे शाश्वत युद्धतत्त्वज्ञान या पुस्तकाचे पहिले वैशिष्ट्य आहे. त्यांच्या राजनीति, राज्यकारभार आणि युद्धविस्तार धोरणातून राष्ट्रसंरक्षणाची तत्त्वे वाचकांसमोर प्रभावीपणे उभी राहतात. यानंतर आधुनिक युगातील प्रमुख लष्करी विचारवंत कार्ल व्हॉन क्लाऊत्सेविझ यांचे On Wa या ग्रंथातील सिद्धांत, युद्ध- धोरण, आक्रमण व संरक्षण, तसेच डावपेचांची शास्त्रशुद्ध मांडणी पुस्तकात आहे. ॲण्टोनी हेन्री जोमिनी यांनी प्रतिपादित केलेली युद्धनीती, तंत्र, पुरवठा व्यवस्था आणि संयुक्त शस्त्रांचा उपयोग यांचे विवेचनही वाचकांना आधुनिक युद्धशास्त्राचे भक्कम आकलन करून देते.\u003cbr\u003eराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये संरक्षणशास्त्राचा समावेश करण्यात आल्याने या विषयाचा शैक्षणिक अभ्यास अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक तसेच लष्करी विचारांमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701383786815,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/1_YudhanitiVicharvant_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775478312","url":"https:\/\/primebookss.in\/products\/yudhaniti-vicharvant","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}