{"product_id":"vittiya-sarksharta","title":"वित्तीय साक्षरता","description":"\u003cp\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात वित्तीय साक्षरता ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक जीवनकौशल्य बनले आहे. पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, बचत व गुंतवणुकीचे तंत्र कसे आत्मसात करावे, डिजिटल युगात सुरक्षित व्यवहार कसे करावे यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक ठरते. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत घटक असून त्याचा योग्य वापर, नियोजन आणि व्यवस्थापन न झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वित्तीय साक्षरता म्हणजे फक्त आर्थिक व्यवहारांची माहिती नव्हे तर उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, विमा, कर्ज व्यवस्थापन आणि निवृत्ती नियोजन यांचा अभ्यास होय.\u003cbr\u003eया पुस्तकाद्वारे वाचकांना वित्तीय साक्षरतेचा अर्थ, बँक खात्यांचे प्रकार, बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, लघुवित्तीय संस्था, डिजिटल फायनान्स, गुंतवणूक, कर्जाचे प्रकार, बचत-गुंतवणुकीतील जोखीम आणि जोखमीचे व्यवस्थापन, विमा, पेन्शन इत्यादींची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक सर्व विद्यापीठांसाठी लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) नुसार सुधारित अभ्यासक्रमांशी सुसंगत आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे विद्याथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्याथ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003eआधुनिक काळात वित्तीय साक्षरतेचे ज्ञान अभ्यासापुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी व गुंतवणुकीसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमाबरोबर प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52690971427135,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/VittiyaSaksharta_DrSurekhaBhingardive-Copy_1.jpg?v=1775312186","url":"https:\/\/primebookss.in\/products\/vittiya-sarksharta","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}