{"product_id":"vidnyan-abhyapanshastra-bhag-2","title":"विज्ञान अध्यापनशास्त्र (भाग 2)","description":"\u003cp\u003eविज्ञान अध्यापनशास्त्र हे पुस्तक बदलत्या शैक्षणिक परिप्रेक्ष्यात विज्ञान विषयाचे अध्यापन अधिक परिणामकारक, अनुभवाधारित आणि जीवनाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठयोजना, मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धती, अभ्यासक्रमातील सुधारणा, तसेच विज्ञान शिक्षकांचा व्यावसायिक विकास यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. प्रकाश संश्लेषण, वनस्पती व प्राण्यांचे वगकरण, मानवी शरीर व आरोग्य, नैसर्गिक चक्रे यांसारख्या संकल्पनांचे अध्यापन प्रत्यक्ष उदाहरणे, प्रयोग, कृतीआधारित उपक्रम आणि चिंतनात्मक प्रश्नांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.\u003cbr\u003eविज्ञान अध्यापनातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम घडवून आणण्यासाठी पुस्तकात विविध अध्यापन पद्धती, तंत्रे आणि नवकल्पना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यरत शिक्षकांना आणि शैक्षणिक संशोधकांना अध्यापनशास्त्रातील सैद्धांतिक बाबींचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग करता येईल.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करणे आणि सत्याच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. अध्यापन अधिक सर्जनशील, प्रभावी आणि प्रेरणादायी बनविण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":55034838647103,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/5_VidnyanAdhyapanshastra_Bhag2_1.jpg?v=1785831166","url":"https:\/\/primebookss.in\/products\/vidnyan-abhyapanshastra-bhag-2","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}