{"product_id":"tao-ek-jeevanpravah","title":"ताओ एक जीवनप्रवाह","description":"\u003cp\u003e    रिक्तताच (Emptiness) असते जीवनाचा प्रारंभ. जेव्हा आपण पूर्ण रिक्त होतो तेव्हाच आपण भरून उसळू लागतो. ताओ आहे न भरणाऱ्या घड्यासारखा. त्याला जाणायचे असेल तर या अमर्याद पोकळीचा अर्थ समूजन घ्यावा लागेल. \u003cbr\u003e    भरणे आणि रिक्त होणे हाच तर जीवनाचा नियम आहे. आपला जन्म आणि मृत्यू भरणे आणि रिक्त होण्याची प्रक्रियाच आहे. हे विश्व म्हणजे अमर्याद अस्तित्वाची साखळी आहे. ती कार्यकारण संबंधांवर (Causal Relationship) असली तरी तिचे दृश्यरूप म्हणजे विश्वव्यवस्था होय. \u003cbr\u003e    या अमर्याद अस्तित्व प्रक्रियेतील परस्परसंबंधाचं रहस्य जाणणे म्हणजे ‘ताओ’ जाणणे होय. ही स्थलकालातीत व्यवस्था एखाद्या अमर्याद महानदीसारखी आहे. ती निरंतर वाहते आहे. तिला कुठलाही किनारा नाही. तिचा आरंभ, अंत आणि मध्य कल्पिता येणार नाही; परंतु तिचे ‘अस्तित्व’ यिन (Yin) व यांग (Yang) या दोन महाशक्तीच्या अंतर्गत ‘समन्वय’ - समतोल आणि ‘सुसंवाद’ प्रक्रियेने (Harmony and Balance) पद्धतीने घडत असते. विकसित होत असते. हे अस्तित्व कधीही विनाश पावत नाही. त्याचे फक्त स्थित्यंतर होत असते. म्हणून ज्ञानी माणसासाठी अंधार आणि प्रकाश एकच गोष्ट असते.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: center;\"\u003eज्याला आपण सुंदर म्हणतो  \u003cbr\u003eते बहुधा असते कुरूपच  \u003cbr\u003eज्याला आपण सत्य म्हणतो  \u003cbr\u003eते असते असत्यच  \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- ताओ ते चिंग (ताओत्से)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52803088941375,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/TaoEkJeevanpravah_BGWagh_Cover_1.jpg?v=1776433045","url":"https:\/\/primebookss.in\/products\/tao-ek-jeevanpravah","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}