{"product_id":"stri-sahitya-ani-strivad","title":"स्त्री साहित्य - स्त्री वाद","description":"\u003cp\u003eसोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे नवीन पुस्तक “स्त्री साहित्य... स्त्री वाद..” वाचकांच्या हाती देताना आनंद वाटतो. त्या लेखिका, समीक्षक तर आहेत, पण सर्जनशील साहित्यिका आहेत. कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख, कविता, एकांकिका, बालसाहित्याची मिळून त्यांची चाळीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या अनेक संस्थांच्या कार्यकारणी वरती आहेत सध्या सोलापूर म.सा.प.च्या अध्यक्ष असून साहित्यिक वाटचालीबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग आहे. प्रभारी प्राचार्य, मराठी विभाग प्रमुख, पीएच.डी.च्या मार्गदर्शिका म्हणून त्यांनी काम केले आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. स्त्रीमुक्तीच्या चळवळीनंतर स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याला उठाव मिळाला. स्त्रिया लिहिताहेत हे अधोरेखित होत असल्याने त्याकडे सजगपणे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत गेला. स्त्रीवादी साहित्याची व्याख्या, त्यातूनच भारतीय व पाश्चात्य स्त्रीवादाची तुलना ओघानच आली. पाश्चात्य स्त्रीची जीवनपद्धती, मानसिकता ही वेगळी म्हणून भारतीय स्त्री जीवनाचे विश्लेषण व्हायला सुरुवात झाली. तिची आत्मचरित्र हा त्याचा आरसा होता. हे नक्की. ती काय करते? तिच्या कार्याची क्षेत्र कोणती? याचाही शोध घेतला जात राहिला. तिचं सुयोग्य चित्र कथा साहित्यात आलं असेल तरी त्याचं स्वरूप काय? या सगळ्या गोष्टीचा विस्ताराने  विचार प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी  या पुस्तकात केला आहे. याचबरोबर महिलांना आरक्षण असणं कायद्याच्या रूपाने किती आवश्यक हेही त्या आग्रह पूर्वक मांडतात. कारण भारतीय महिलांना कायद्यानेच पुरुषां बरोबरीच्या सवलती मिळाल्यात, मग ते शिक्षण असो, वारसा हक्क असो की मतदान. हे लेखिका जाणून आहे. त्यांच्या मुलाखतीतून त्यांची भूमिका जास्त स्पष्ट होते. हा “स्त्री साहित्य..स्त्री वाद..” समीक्षणात्मक लेखसंग्रह मराठी साहित्याला आणखी समृद्ध करेल व अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी होईल हे निश्चित.. या प्रतिथयश लेखिकेला उर्वरित लेखनासाठी अनेक शुभेच्छा...\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. छाया महाजन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिका, माजी प्राचार्या,\u003cbr\u003eडॉ. आय.बी.पी. महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792859918655,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/StriSahityaAniStrivad_DrShrutiWadagbalkar_1.jpg?v=1776325097","url":"https:\/\/primebookss.in\/products\/stri-sahitya-ani-strivad","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}