{"product_id":"share-bajarachi-olkha","title":"शेअर बाजाराची ओळख","description":"\u003cp\u003eआपल्या देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणुकीला मोठे महत्त्व आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी शेअर बाजार हा सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. यात काही प्रमाणात जोखीम असली तरी योग्य माहिती आणि समज असलेला गुंतवणूकदार नक्कीच चांगला फायदा मिळवू शकतो. त्यामुळेच शेअर बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शेअर बाजाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास, प्राथमिक व दुय्यम बाजार, बीएसई व एनएसईची माहिती, सेबीची भूमिका, निर्देशांक, डिमॅट खाते, आयपीओ-एनएफओ-एफपीओ, म्युच्युअल फंड, डखझ व डथझ अशा अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य वाचकांना समजतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत.\u003cbr\u003eहे पुस्तक सर्व विद्यापीठांसाठी लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ-2020) नुसार सुधारित अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याचबरोबर शेअर बाजारात नवीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठीही हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.\u003cbr\u003eआजच्या काळात शेअर बाजाराचे ज्ञान केवळ अभ्यासापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि गुंतवणुकीच्या योग्य संधी शोधण्यासाठी ते अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातही उपयुक्त ठरेल, हा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52690567692607,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ShareBajarachiOlkha_DrMaharudraKhose-Copy_1.jpg?v=1775311844","url":"https:\/\/primebookss.in\/products\/share-bajarachi-olkha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}