{"product_id":"sarvabhaum","title":"सार्वभौम","description":"\u003cp\u003eकवितेचे दृश्यमान परिप्रेक्ष म्हणजे अदृश्यमान अस्वस्थतेचे सर्जनात्मक बीजरोपण होय. कविता दृश्यरूप धारण करते त्यावेळेला तिचे असणारे छोटेसे अस्तित्त्व प्रदीर्घ विचारचिंतन पटलावरील असंख्य केंद्रांमधून प्रसवलेलं सारगर्भ रूप असते. सार्वभौम या कवितासंग्रहातील कवितांना अशा विस्तीर्ण विचारचिंतनाच्या पटलावरील प्रत्येक केंद्रांना स्पर्शन्याचा अनुभूतीजन्य अस्सल अनुभव प्राप्त झाल्याचे स्पष्टपणाने दिसते. त्यामुळे कवितेचे आयाम वैविध्यतेने सक्षम होतांना दिसतात.\u003cbr\u003eशशिकांत हिंगोणेकरांची मूलगामी प्रकृती सातत्यपूर्ण चिंतनगर्भ वलयात वात वारंवार मुशाफिरी करण्याची असल्याने ते कवितेशी तादात्म्य पावतांना दिसतात. त्यांच्यातील आतील बाहेरील असणारा काव्यभाव हा पूर्णपणे कविताच असल्यामुळे कवी नेहमीसाठीच कविता होतांना दिसतो. या कवितासंग्रहाच्या निमित्ताने हिंगोणेकर प्रभावीपणाने काव्याच्या सार्वभौम मार्गाला प्रस्थापित करतांना दिसतात. त्यामुळे काव्याचे सार्वभौमत्व अधिष्ठित होण्यासाठी त्यांच्या कविता लेखनाला अनेकानेक शुभेच्छा !\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा.डॉ.म.सु.पगारे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसंचालक, भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र, \u003cbr\u003eवरिष्ठ प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख.\u003cbr\u003eसंचालक, विचारधारा प्रशाळा,क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825557434687,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sarvabhoum_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776924849","url":"https:\/\/primebookss.in\/products\/sarvabhaum","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}