{"product_id":"sanvad-kaushalye","title":"संवाद कौशल्ये","description":"\u003cp\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी संवाद आणि भाषिक कौशल्य यांचा सर्वसमावेशक अभ्यास उपलब्ध करून देते. यात संवाद कौशल्याचे तंत्र, संवादकौशल्याची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये यापासून सुरूवात करून सूत्रसंचालन कौशल्य, वक्तृत्त्व कौशल्य, भाषण कौशल्य आणि वादविवाद कौशल्य यांपर्यंत प्रत्येक पैलू सविस्तर समजावून सांगितला आहे. पुस्तकात सूत्रसंचालनाचे तंत्र, वैशिष्ट्ये, पाळावयाची पथ्य, वक्तृत्वपटूचे गुण आणि प्रभावी भाषणासाठी आवश्यक तयारी यावर भर दिला आहे. तसेच, भाषणाचे सादरीकरण, भाषिक उपयोजन, प्रभावी भाषण कसे करावे, वादविवादासाठी विषयाची निवड, प्रत्यक्ष खंडन मंडण, वादविवादाचे परीक्षण आणि स्पर्धेतील सहभाग या सर्व गोष्टींवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. \u003cbr\u003eप्रा. डॉ. संदीप माळी लिखित हे पुस्तक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून नव्हे, तर व्यावहारिक जीवनात संवाद साधताना आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्व आणि सार्वजनिक बोलण्याची कला विकसित करण्यासही उपयुक्त ठरते. सहज वाचता येणारी भाषा, उदाहरणे आणि सुस्पष्ट स्पष्टीकरणे यामुळे हे पुस्तक अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर डॉ. किशोर एन. सोनवणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eअध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ \u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव \u003cbr\u003eप्रभारी प्राचार्य, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे \u003cbr\u003eदादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703991365951,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SanvadKaushalye_DrSandipMali-1.jpg?v=1775542221","url":"https:\/\/primebookss.in\/products\/sanvad-kaushalye","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}