{"product_id":"sanskritik","title":"सांस्कृतिक","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व प्रयोजन यांचे सविस्तर विवेचन केले आहे.\u003cbr\u003eपहिल्या प्रकरणात रांगोळी, स्वागतगीत, भित्तिपत्रक, अतिथी परिचय, आभार प्रदर्शन, रचना, वर्तमानपत्र लेखन व वार्षिकांक यांचा परिचय दिला आहे. दुसऱ्या प्रकरणात कविता, संकलन, सांस्कृतिक उपक्रम, रॅली, निबंध व विविध राष्ट्रीय\/सांस्कृतिक दिन यांचे स्वरूप व प्रकार स्पष्ट केले आहेत. तिसऱ्या प्रकरणात सुत्रसंचालन, कथा, वाद्यकला, एकपात्री प्रयोग, अभिनय, फॅशन शो व लोककला यांचे स्वरूप व प्रकार मांडले आहेत. चौथ्या प्रकरणात वादविवाद, कथाकथन, अभिवाचन, सांस्कृतिक स्पर्धा, सजावट व साहित्य संमेलन यांचे स्वरूप व प्रयोजन दिले आहे.\u003cbr\u003eया पुस्तकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, भारतीय परंपरा व विविधतेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मता यांचा विकास साधता येईल. तसेच कला, संस्कृती, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, नाट्य, संगीत व चित्रपट या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील.\u003cbr\u003eसांस्कृतिक उपक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे प्रभावी साधन ठरतात. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्याथ, शिक्षक तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704705577279,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sanskritik_DrPankajkumarNannavare_1.jpg?v=1775565551","url":"https:\/\/primebookss.in\/products\/sanskritik","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}