{"product_id":"sanrkshan-patrakaritechi-multattve","title":"संरक्षण पत्रकारितेची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eपत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. समाजातील अन्याय, त्रुटी आणि सत्तेतील जबाबदारी उघड करण्याबरोबरच माध्यमे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित जनजागृती घडवून आणतात. म्हणूनच “संरक्षण पत्रकारिता” (Defence Journalism) हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्करी बाब नसून तिच्यात राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि परराष्ट्र धोरणाचेही पैलू येतात. या पुस्तकात संरक्षण पत्रकारितेचे महत्त्व, गरज, कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्या यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eपत्रकारितेची मूलतत्त्वे, संरक्षण पत्रकारितेतील विशिष्ट भूमिका, राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरण, संरक्षण संघटनांची माहिती, पारिभाषिक शब्दसंग्रह, संरक्षण वृत्तसंकलन व वृत्तलेखन या सर्व घटकांचा यात अभ्यासक्रमानुसार समावेश आहे. तसेच संरक्षण पत्रकारितेसाठी आवश्यक कायद्याचे ज्ञान, उपलब्ध साधने आणि करिअरच्या संधींचाही आढावा यात देण्यात आला आहे. भारतामध्ये स्पेशलाईज्ड संरक्षण पत्रकारांची मोठी उणीव आहे. त्यामुळे या क्षेत्रात संधींचे दरवाजे उघडे आहेत. वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच इलेक्ट्रॉनकि व डिजिटल माध्यमांमध्ये संरक्षण पत्रकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध आहे. हे पुस्तक संरक्षणशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वृत्तपत्रविद्येची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व वाचकांना मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701357965631,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/3_SanrkshanPatrakaritechiMultattve_DrDevendraVispute_1.jpg?v=1775477442","url":"https:\/\/primebookss.in\/products\/sanrkshan-patrakaritechi-multattve","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}