{"product_id":"sanrakshan-aani-samrik-abhyas-madhye-digitalization-vapar","title":"संरक्षण आणि सामरिक अभ्यासामध्ये  डिजिटलायझेशनचा वापर","description":"\u003cp\u003eआजचे युद्ध पारंपरिक रणभूमीच्या चौकटीत मर्यादित राहिलेले नसून सायबर स्पेसपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, प्रगत सेन्सर्स आणि डिजिटल नेटवर्क्स यामुळे युद्ध अधिक अचूक, गतिमान आणि सुरक्षित बनले आहे. सायबर युद्ध, ग्रे-झोन रणनीती आणि हायब्रिड संघर्ष यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे.\u003cbr\u003eया बदलत्या युद्धतंत्राच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार ‘संरक्षण आणि सामरिक अभ्यासामध्ये डिजिटलायझेशनचा वापर’ हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक युद्धातील तांत्रिक बदल, डिजिटल प्रणालींचा वापर, सायबर सुरक्षेचे संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजना यांचे सखोल आणि सुलभ विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eसुबोध भाषाशैलीत मांडलेला हा विषय विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पना समजून घेण्यास मदत करतो, तसेच संरक्षण क्षेत्रातील नव्या दिशांचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतो. आधुनिक युद्धकलेच्या बदलत्या स्वरूपाची समज प्राप्त करून देणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी एक उपयुक्त आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701361242431,"sku":null,"price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sanrkshan_Aani_Samrik_Dr_Devendra_Vispute_1.jpg?v=1775480098","url":"https:\/\/primebookss.in\/products\/sanrakshan-aani-samrik-abhyas-madhye-digitalization-vapar","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}