{"product_id":"samajik-sanshodhan-paddhati","title":"सामाजिक संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e‘सामाजिक संशोधन पद्धती’ हा ग्रंथ मानवी वर्तन, सामाजिक संबंध, संस्था आणि सामाजिक समस्यांचा शास्त्रीय व पद्धतशीर अभ्यास करून नवीन तथ्ये शोधण्याची किंवा जुन्या तथ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. सामाजिक जीवनातील गुंतागुंती समजून घेण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून विश्वसनीय ज्ञाननिर्मिती कशी होते, याचे सविस्तर विवेचन या ग्रंथात आढळते.\u003cbr\u003eया पुस्तकाची रचना अत्यंत पद्धतशीर असून त्यात संशोधनाची व्याख्या, वैशिष्ट्ये, उद्दीष्ट्ये, उद्देश, कार्ये आणि व्याप्ती यांचा सखोल आढावा घेतला आहे. संशोधनाचे प्रकार-मुलभूत, उपयोजित, आंतरशास्त्रीय, कृती संशोधन आणि बहुविद्याशाखीय संशोधन-यांची स्पष्ट मांडणी केली आहे. ऐतिहासिक, वर्णनात्मक, व्यष्टी अध्ययन, तौलनिक, प्रायोगिक, क्षेत्रीय, सहभागी, गुणात्मक संशोधन पद्धतींसह डेल्फी तंत्र, आशय विश्लेषण, उद्धरण विश्लेषण, परिदृश्य लिखाण आणि भविष्यकालीन कल अंदाज यांसारख्या आधुनिक तंत्रांचा समावेश या ग्रंथाला विशेषत्व देतो.\u003cbr\u003eसंशोधन समस्या, आराखडा, गृहीतके, नमुना निवडीचे तंत्र, साहित्य पुनरावलोकन, तथ्य संकलन, विश्लेषण व निर्वचन, सांख्यिकीय विश्लेषण, तथ्य सादरीकरण, अहवाल लेखन, शैली मार्गदर्शक, संदर्भ व्यवस्थापन साधने, अहवालाचे मूल्यमापन, वाड्मयचौर्य तपासणी साधने, संशोधन मोजणी, प्रभाव घटक आणि संशोधन नीतीशास्त्र या सर्व घटकांचा सखोल अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003cbr\u003eडझडड, चखछखढअइ, चअढङअइ यांसारख्या सांख्यिकीय सॉफ्टवेअर्सची ओळख, एपवछेींश, चशपवशश्रशू, नेींशेी यांसारख्या संदर्भ व्यवस्थापन साधनांची माहिती, तसेच ढीपळींळप आणि णीज्ञपव सारख्या वाड्मयचौर्य तपासणी साधनांचा उपयोग यामुळे संशोधन अधिक दर्जेदार आणि विश्वसनीय ठरते. स्पर्धा परीक्षा, छएढ\/डएढ तसेच संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा हा संदर्भग्रंथ प्रत्येक अभ्यासकाच्या संग्रही असायलाच हवा.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53697059651903,"sku":null,"price":446.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SamajikSanshodhanPaddhati_DrPradipPatil_1.jpg?v=1781849485","url":"https:\/\/primebookss.in\/products\/samajik-sanshodhan-paddhati","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}