{"product_id":"rashtriya-surksheche-sankalpanatmak-pailu","title":"राष्ट्रीय सुरक्षेचे संकल्पनात्मक पैलू","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकात राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अधिक व्यापक, गतिमान आणि बहुआयामी झाली आहे. सुरक्षेच्या पारंपरिक लष्करी पैलूंसोबतच आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि पर्यावरणीय पैलूदेखील आता राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग झाले आहेत.\u003cbr\u003eआजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान काळात दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, मादक पदार्थ व शस्त्रांची तस्करी, सायबर सुरक्षा, स्थलांतरित व निर्वासितांचे प्रश्न, पर्यावरणीय असंतुलन आणि नैसर्गिक आपत्ती या सर्व बाबींनी राष्ट्रीय सुरक्षेला नवे स्वरूप दिले आहे. राष्ट्रशक्तीची घडण भूगोल, नैसर्गिक संसाधने, औद्योगिक क्षमता, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक व व्यापारी सामर्थ्य, तसेच सामाजिक व राजकीय घटकांवर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात “राष्ट्रहित” हाच प्रत्येक देशाचा सर्वोच्च ध्येय मानला जातो, कारण हितसंबंध बदलत नसतात; बदलतात ती फक्त परिस्थिती आणि नाती. आज राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पना अधिक संवेदनशील बनल्या असून प्रादेशिक व जागतिक अस्थिरतेमुळे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या संकल्पनात्मक पैलूंचे अध्ययन अपरिहार्य ठरते.\u003cbr\u003eया पुस्तकात राष्ट्रीय सुरक्षेतील विविध घटकांचा आढावा घेण्यात आला असून, भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, संस्कृती व समाजशास्त्र या सर्व दृष्टीकोनातून विषयाची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षाथ तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षणशास्त्रात रस असलेल्या सर्वांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701355508031,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/2_RashtriyaSurkshecheSankalpanatmakPailu_DrDevendraVispute_1.jpg?v=1775477167","url":"https:\/\/primebookss.in\/products\/rashtriya-surksheche-sankalpanatmak-pailu","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}