{"product_id":"prat-shaikshanik-tattvadnyan-aani-samajashastra","title":"प्रगत शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते. बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणाची संकल्पना, ध्येये, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र यांचा सखोल परिचय करून देणे हे या ग्रंथाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात शिक्षणाचा अर्थ, स्वरूप, संकल्पना, व्याप्ती, प्रक्रिया, महत्त्व आणि प्रकार यांचा ऊहापोह केला आहे तसेच शिक्षणाची ध्येये स्पष्ट केली आहेत. दुसऱ्या भागात भारतीय शिक्षणाचा वारसा, वैभवशाली संस्कृतीचे ज्ञानभांडार, भारतीय शैक्षणिक तत्त्वज्ञान परंपरा, प्राचीन व मध्ययुगीन शिक्षण वैशिष्ट्ये, जैन शिक्षण पद्धती, स्त्री शिक्षण वारसा आणि ब्रिटिश राज्यातील शिक्षणाचा वारसा यांचा सखोल विचार केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतिसऱ्या भागात तत्त्वज्ञानाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे कार्य आणि विविध संप्रदायांचे योगदान यांचा अभ्यास आहे. चौथ्या भागात लोकशाही समाजातील शिक्षणाची भूमिका, त्याची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, शिस्त, शिक्षक व शाळा प्रशासन यांचा संबंध स्पष्ट केला आहे. पुढील विभागात शिक्षण संस्था व प्रकार, व्यक्ती-समूह अंतरक्रिया संस्था आणि कुटुंब यांचा विचार केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय समाज आणि शिक्षण या विभागात शिक्षणाची संकल्पना, उद्दिष्टे, संस्कृती आणि शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ दिला आहे. शिक्षणातील सामाजिक नियंत्रण, सांस्कृतिक संक्रमण आणि सामाजिक परिवर्तन यांचा ऊहापोह पुढील विभागात केला आहे. शेवटच्या भागात शिक्षण आणि समाजशास्त्र यांचा संबंध, समाजशास्त्रीय दृष्टिकोन, प्रमुख संकल्पना, सामाजिक स्तरीकरणातील शिक्षणाची भूमिका आणि समाजातील शिक्षणाचे कार्य यांचा सखोल अभ्यास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात तत्त्वज्ञान व समाजशास्त्राच्या संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. भारतीय शिक्षणाचा वारसा आणि आधुनिक संदर्भ यांचा तुलनात्मक अभ्यास करून विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञानात्मक बैठक व समाजशास्त्रीय दृष्टिकोन समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602346275135,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PragatShaikshanikTattvadnyanAaniSamajshastra_DrKishorSonawane-9.jpg?v=1775144332","url":"https:\/\/primebookss.in\/products\/prat-shaikshanik-tattvadnyan-aani-samajashastra","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}