{"product_id":"paryantan-bhugol","title":"पर्यटन भूगोल","description":"\u003cp\u003eअत्यंत पूव पासून मानव आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या साधनसंपत्तीचा वापर करून आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मग त्यात आपला आर्थिक विकास असेल सामाजिक असेल किंवा भौगोलिक असेल या सर्व अंगाने मानव उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर आपल्या स्वतःच्या व्यवसायाला प्रगतिशील करण्यासाठी करत आलेला आहे. संपूर्ण पृथ्वीवर साधन संपत्तीचे वितरण देखील असमान आहे त्याचा वापर स्थळ काल परत्वे प्रत्येक मानव आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आणि आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे करत आलेला आहे. \u003cbr\u003eपर्यटन ही मानवी भूगोलाची उपयोजित शाखा विसाव्या शतकाच्या मध्यंतरापासून प्रगत झालेली दिसून येते. पूव पासून मानवाला प्रवास करणे हे जीवन जगत असताना अत्यावश्यक बाब समजली जाते. पुरी पासून प्रत्येक माणूस आपला जीवनाचा आनंद घेण्यासाठी नवीन स्थळांना भेट देणे, धार्मिक स्थळांची भेटी देऊन आत्मिक आनंद शोधणे, व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांना भेट देणे किंवा नवीन प्रदेश शोधण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विविध उद्देशाने माणूस हा प्रवास करत राहिला आणि त्यामधून पर्यटन ही आधुनिक संकल्पना उदयाला आली. खऱ्या अर्थाने पर्यटन हा शब्द तेराव्या शतकापासून प्रचलित झालेला असून विशिष्ट उद्देशाने प्रवास करून ठराविक ठिकाणी परत आला म्हणजे त्याला पर्यटन म्हणतात अशी संकल्पना त्या काळात उदयास आली. या उद्देशाने अत्यंत सर्वंकषपणे पर्यटन भूगोलाचा अभ्यास या पुस्तकात मांडण्याचा लेखकांनी प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704476365119,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ParyatanBhugol_DrNitinkumarMali_1.jpg?v=1775556416","url":"https:\/\/primebookss.in\/products\/paryantan-bhugol","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}