{"product_id":"mulyanirdharan-v-mulyamapan","title":"मूल्यनिर्धारण व मूल्यमापन","description":"\u003cp\u003eशिक्षणप्रक्रियेत अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन हे तीन घटक परस्परावलंबी असून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य करण्यासाठी त्यांचा समन्वय आवश्यक आहे. अध्यापनाचे खरे फलित विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून कितपत साध्य झाले आहे, याचे शास्त्रशुद्ध परीक्षण म्हणजेच मूल्यमापन. आधुनिक शिक्षणपद्धतीत मूल्यमापन केवळ परीक्षांपुरते मर्यादित न राहता अध्ययनासाठी, अध्ययन म्हणून आणि अध्ययनाचे मूल्यमापन या व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जाते.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील विद्याथ, कार्यरत शिक्षक तसेच शैक्षणिक संशोधक यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. यात मापन, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन या संकल्पनांचा सखोल उलगडा, शैक्षणिक उद्दिष्टे व अध्ययन निष्पत्ती, ब्लूमचे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वगकरण, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नंतर झालेल्या बदलांचा सविस्तर आढावा घेतला आहे.\u003cbr\u003eपुस्तकात मूल्यमापनाची विविध तंत्रे व साधने, क्षमताधारित व संचिका मूल्यनिर्धारण, तसेच Google Forms, Kahoot, Quizizz, Mentimeter, Padlet यांसारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा व्यवहार्य उपयोग स्पष्ट केला आहे. स्वयं व सहाध्यायी मूल्यमापन, रुब्रिक व समग्र प्रगतीपत्रक यांचा प्रत्यक्ष शालेय व्यवहाराशी निगडित अभ्यास करण्यात आला आहे. याशिवाय सांख्यिकीतील केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलता, सहसंबंध व प्रसामान्य वक्र यांचा सुलभ व उदाहरणाधारित अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक वाचकांना केवळ सैद्धांतिक ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना परिणामकारक, विद्याथ-केंद्रित व आधुनिक मूल्यमापन पद्धती आत्मसात करण्यास सक्षम करते. शिक्षकांनी या पुस्तकाचा उपयोग करून आपल्या अध्यापनात मूल्यमापनाला योग्य स्थान दिल्यास शिक्षणप्रक्रिया अधिक अर्थपूर्ण, आनंददायी व फलदायी बनेल.\u003cbr\u003eहे पुस्तक म्हणजे आधुनिक शिक्षणातील मूल्यमापनाची सखोल समज आणि व्यवहार्य मार्गदर्शन देणारा विश्वासार्ह साथीदार!\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52712543387967,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MulyanirdharanVMulyamapan_DrHNJagtap1.jpg?v=1775741808","url":"https:\/\/primebookss.in\/products\/mulyanirdharan-v-mulyamapan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}