{"product_id":"margdarshan-samupdeshan-aani-samaveshak-shikshan","title":"मार्गदर्शन समुपदेशन आणि समावेशक शिक्षण","description":"\u003cp\u003eमार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण हे पुस्तक आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आजच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. शाळेत येणारा प्रत्येक विद्याथ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो. त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक स्थिती वेगळी असते. या विविधतेचा विचार करून शिक्षकाने अध्यापन करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकाला मार्गदर्शन व समुपदेशनाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची संकल्पना, उद्दिष्टे व प्रक्रिया, शालेय मार्गदर्शन समितीची भूमिका व कार्य, समुपदेशनाचे प्रकार, तत्वे व प्रक्रिया, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व सामाजिक फायदे, शिक्षकाची सज्जता, जबाबदाऱ्या व व्यावसायिक नीती, विविध गरजा असणाऱ्या बालकांचे शैक्षणिक व सामाजिक प्रश्न तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या बालकांच्या समस्या व उपाययोजना यांचा सखोल विचार केलेला आहे.\u003cbr\u003eलेखकांनी या सर्व पैलूंचा सुसंगत व सर्वसमावेशक आढावा घेतला असून हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715405115711,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/15_MargdarshanSamupdeshanAaniSamaveshakShikshan_DrDipakBaviskar1.jpg?v=1775801317","url":"https:\/\/primebookss.in\/products\/margdarshan-samupdeshan-aani-samaveshak-shikshan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}