{"product_id":"marathi-abhyapanshastra-bhag-2","title":"मराठी अध्यापनशास्त्र (भाग 2)","description":"\u003cp\u003eमराठी अध्यापनशास्त्र हे पुस्तक बदलत्या शैक्षणिक परिप्रेक्ष्यात मराठी भाषेचे अध्यापन अधिक सुसंगत, अनुभवाधारित आणि विद्याथकेंद्रित बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून मातृभाषेतून शिक्षण, बहुभाषिकतेचा पुरस्कार आणि भाषिक कौशल्यांचा विकास यावर विशेष भर देण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठयोजना, ज्ञानरचनावाद, मूल्यमापनाच्या विविध पद्धती, अभ्यासक्रम व पाठ्यक्रमातील फरक, पाठ्यपुस्तकांचे चिकित्सक परीक्षण, तसेच भाषेची विविध कौशल्ये यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. शाब्दिक व अशाब्दिक अध्ययन अनुभव, अभ्यासानुवत उपक्रम, वाड्मय मंडळ, व्याकरण अध्यापन, लेखनकौशल्ये आणि कृतिसंशोधन यांसारख्या घटकांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.\u003cbr\u003eविविध उदाहरणे, उपक्रम, आकृत्या आणि तक्ते यांच्या माध्यमातून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यरत शिक्षकांना आणि शैक्षणिक संशोधकांना अध्यापनशास्त्रातील सैद्धांतिक बाबींचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग करता येईल.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि मातृभाषेचा वारसा पुढील पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचविणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. अध्यापन अधिक सर्जनशील, प्रभावी आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":55034016497983,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/4_MarathiAdhyapanshastra_Bhag2_1.jpg?v=1785830468","url":"https:\/\/primebookss.in\/products\/marathi-abhyapanshastra-bhag-2","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}