{"product_id":"krantdarshi-dr-m-n-wankhade-janmshatabdi-kritdnyatagranth","title":"क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ","description":"\u003cp\u003eडॉ. म. ना. वानखडे यांनी जीवनाच्या आणि साहित्याच्या चर्चाविश्वात एका प्रगमनशील सौंदर्याचं नवं युग निर्माण केलं. त्यात रॅशनल नीतीचं वैश्विक सौंदर्य आहे आणि साहित्याच्या सौंदर्याची पुनर्रचनाशील नीती आहे. एवढंच नाही तर त्यांनी उभारलेल्या पायाभूत ज्ञानव्यवहारात या दोन्हींची अविभाज्यताच आपल्या प्रत्ययाला येते.\u003cbr\u003e     या क्रांतदर्शी ज्ञानमंथनातून म.ना. वानखडे नावाचा एक अस्सल तत्त्ववेत्ता आपल्याला दिसतो. सर्वसमावेशकता आणि सर्वांचे समान हितसंबंध या पायावर त्यांची सौंदर्यसंकल्पना अधिष्ठित आहे. या बंडखोर प्रज्ञावंतानं जीवन आणि साहित्य या दोन्हींसाठी अनिवार्य तत्त्वज्ञान मांडलं आहे.\u003cbr\u003e     या अस्सल प्रज्ञावंताच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा कृतज्ञताग्रंथ निर्माण झाला आहे. या ग्रंथातील प्रत्येकच शब्दावर म.ना. वानखडे हे विशेषनाम कोरलेलं आहे आणि या ग्रंथातील सर्वच शब्दांच्या बेरजेचं नावही कृतज्ञता हेच आहे. हे एका खन्ऱ्याच क्रांतदर्शित्वाला केलेले विनम्र अभिवादन आहे.\u003cbr\u003e     'क्रांतदर्शी डॉ.म.ना. वानखडे' हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अनेक चाहत्यांनी निर्माण केलेला कृतज्ञतेचा दीपस्तंभ आहे. या ग्रंथातून पुढल्या पिढ्यांना म.ना. वानखडे नावाचा गगनभेदी दीपस्तंभ वाचताही येईल, बघताही येईल आणि विश्वासू मार्गदर्शक म्हणून सोबतही घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789007548735,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KrantdarshiDrMNWankhade_YashwantManohar_1.jpg?v=1776261961","url":"https:\/\/primebookss.in\/products\/krantdarshi-dr-m-n-wankhade-janmshatabdi-kritdnyatagranth","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}