{"product_id":"khandesh-kathaprabodha-sahitya-v-samiksha","title":"खान्देश कथाप्रबोध : साहित्य व समीक्षा","description":"\u003cp\u003e‘कथा’ हा साहित्यप्रकार अत्यंत महत्वाचा आणि मानवाच्या मुलप्रवृत्तीशी निगडीत असलेला साहित्यप्रकार आहे. कथा सांगणे आणि ऐकणे याची आवड मानवी स्वभावातच दडलेली आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात खान्देशातील साहित्यिकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. कथा साहित्यात खान्देशी कथाकारांनी मोलाची भर घातलेली असून बोलीभाषा, आशयसौंदर्य, आविष्कार आणि निवेदन पद्धती या घटकांच्या पारंपारिक ढाच्याची मोडतोड खान्देशी कथेत दिसून येते. मराठी साहित्यात खान्देशी कथा ही वेगळी आणि महत्वाची म्हणूनच ठरलेली आहे. खानदेश कथाप्रबोध : साहित्य व समीक्षा ग्रंथात खान्देशातल्या निवडक कथाकारांच्या कथांची विलक्षण समीक्षा असून कथेच्या संदर्भातील तांत्रिक घटक आणि एकूणच कथा या साहित्यप्रकाराविषयी मुलभूत आणि नेमकी मांडणी केलेली आहे. विविध कथांच्या संदर्भात खानदेशातील विविध समीक्षकांनी सूक्ष्मपणे केलेली ही समीक्षा कथेचे स्थूल आकलन आणि कथेच्या स्वरूपाचा बोध होण्यास उपकारक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर डॉ. वासुदेव सोमाजी वले\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसदस्य, मराठी अभ्यासमंडळ,\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52773041668415,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KhandeshKathaprabodha_SwapnilBhosale_1.jpg?v=1776177573","url":"https:\/\/primebookss.in\/products\/khandesh-kathaprabodha-sahitya-v-samiksha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}