{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-pranali-i","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली - I","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणणारे ठरले आहे. या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय, समग्र व जीवनाशी निगडित शिक्षण मिळावे, हा प्रमुख हेतू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ हा विषय Open Elective (OE) स्वरूपात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना ग्रंथालय व माहितीशास्त्राची  प्राथमिक ओळख करून देते. ग्रंथालयांचे प्रकार, माहिती साधने व स्त्रोत, शैक्षणिक ग्रंथालयांची रचना व नियम, नीतिशास्त्र, संग्रह व्यवस्थापन, प्रवेश प्रणाली, तसेच मूलभूत व विशेष सेवा या सर्व गोष्टी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. संदर्भ सेवा, ग्रंथालय अभिमुखता, आंतरग्रंथालय देवघेव, प्रलेखन, भाषांतर, साहित्य शोध आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आधुनिक सेवा यांचा उपयोग विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने स्पष्ट केला आहे. \u003cbr\u003e‘ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रणाली’ हा ग्रंथ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृतीची जाणीव करून देणारा, माहितीच्या शोधकौशल्यांचा विकास करणारा आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व अधोरेखित करणारा उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701218472255,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/FYBA_GranthalayAaniMahitishastraPranali-I_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775470014","url":"https:\/\/primebookss.in\/products\/granthalay-aani-mahitishastra-pranali-i","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}