{"product_id":"ekavisavya-shatkatil-marathi-kadambarine","title":"एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीने सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पातळीवर नवे क्षितिज गाठले आहे. ग्रामीण-शहरी वास्तव, जात-लिंग-श्रम यांचे भेद, जागतिकीकरणाचे परिणाम, अस्तित्वाचा संघर्ष आणि आत्मशोधाच्या वाटा यांचे विविधांगी चित्रण या काळातील मराठी कादंबऱ्यांमधून समर्थपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या संपादनाखाली साकारलेला ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह’ हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समग्र समीक्षणाचा आदर्श नमुना ठरतो. डॉ. पाटील यांची सर्वसमावेशक दृष्टी, काटेकोर व साक्षेपी निवड आणि विषयाशी सुसंगत अभ्यासकांचा सहभाग या ग्रंथाला संशोधनपर आणि संदर्भात्मक मूल्य बहाल करतो. या कादंबऱ्यांचे विश्लेषण करणारे लेखकही महाराष्ट्र व गोव्यातील विविध विद्यापीठांतील, विविध पिढ्यांचे, भिन्न साहित्यदृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी लेखकमंडळी आहेत. त्यांनी त्यांच्या सामाजिक-राजकीय जाणिवा आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून या कादंबऱ्यांचे सखोल वाचन करून अतिशय अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.  \u003cbr\u003eविविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि लिंगविवेकाशी निगडित 24 महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण या ग्रंथात आहे. हा ग्रंथ एकविसाव्या शतकातील कादंबऱ्यांची केवळ समीक्षा नसून समकालीन सामाजिक बदलांचा दस्तऐवज आहे. या सर्व कादंबऱ्यांची निवड आणि विविध समीक्षा दृष्टिकोनांतून साकारलेली त्यावरील चिकित्सक चर्चा एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीचा आशयसंपन्न प्रवास तसेच आशय, स्वरूप व प्रवाह समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003eसाहित्य, भाषा व समाजजीवनाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींसाठी हा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भ ठरेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788175307071,"sku":null,"price":356.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/21vyaShatkatilMarathiKadambariSamiksha_RahulPatil_1.jpg?v=1776246367","url":"https:\/\/primebookss.in\/products\/ekavisavya-shatkatil-marathi-kadambarine","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}