{"product_id":"dnyan-aani-abhyasakram_dr-nagesh-d-sarvade","title":"ज्ञान आणि अभ्यासक्रम","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा सखोल अभ्यास करणारा हा संदर्भग्रंथ विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणातील बदल, अभ्यासक्रमाची पुनर्रचना, ज्ञानाचे स्वरूप आणि त्याचे संप्रेषण यांचा स्पष्ट व सुसंगत आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. ज्ञानाचे स्वरूप, प्रकार आणि निर्मिती प्रक्रिया, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, तत्त्वे, घटक, नियोजन व अंमलबजावणी यांचा सखोल अभ्यास, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक व तांत्रिक घटकांचा प्रभाव, भाषा संपादन, वर्गातील भाषा आणि बहुभाषिक शिक्षणातील आव्हाने व उपाययोजना यांचा समावेश या ग्रंथात आहे. सोपी, स्पष्ट आणि विद्यार्थ्याभिमुख भाषा ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये असून वाचकांना शैक्षणिक यशाबरोबरच विचारशील व जबाबदार नागरिकत्वाकडे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य यात आहे.\u003cbr\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची व्याप्ती सतत बदलत आहे. अशा परिस्थितीत हा ग्रंथ वाचकांना शिक्षणाच्या व्यापक संदर्भाचे आकलन करून देतो आणि त्यांना नव्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत राहण्यास मदत करतो. वाचकांच्या सूचनांचे स्वागत करून पुढील आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52722755764543,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Dnyan_Aani_Abhyasakram_Dr_Nagesh_D_Sarvade_1.jpg?v=1776089249","url":"https:\/\/primebookss.in\/products\/dnyan-aani-abhyasakram_dr-nagesh-d-sarvade","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}